Nashik News: सोशल माध्यमातून मोठया प्रमाणात फेक बातम्या आणि अफवा पसवल्या जातात. त्या अफवांची खा त्री न करता त्या फेक बातम्या पुढे समाज माध्यमात वेगाने पसरविल्या जातात. त्यामुळे बऱ्याचदा बातमी किंवा अफवा जी व्यक्ती किंवा संस्थेशी निगडित असते त्यांना नाहक मानसिक आणि काही वेळेस आर्थिक फटका सहन करावा लागतो. नाशिक महापालिकेबाबत ही अशीच एक घटना समोर आली आहे. नाशिक महानगरपालिकेच्या घरपट्टी व पाणीपट्टीचे इंडेक्स क्रमांक बंद करण्याचे फेक मेसेज पाठविण्यारयांविरोधात सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
नेमके प्रकरण असे आहे, नाशिक शहरातील रहिवाशांना आपली घरपट्टी व पाणीपट्टी अनुक्रमांक अद्यावत नाहीत ते अद्यावत करण्यासाठी संपर्क क्रमांकावर संपर्क करावा अशा आशयाचे मेसेज फेक भ्रमणध्वनी क्रमांक 6297019792 व 6005481746 यावरून
जात आहेत. अशा स्वरूपाचे कोणतेही मेसेज नाशिक महानगरपालिकेच्या वतीने पाठविले जात नाहीत. असे महापालिकेच्या वतीने स्पट करण्यात आले आहे.
अश्या प्रकारचे मेसेज प्राप्त झाल्यास त्याकडे दुर्लक्ष करावे असे आवाहन मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी केले आहे. ज्या दोन फेक क्रमांकावरून मेसेज जात होते ते दोन्ही क्रमांक पोलीस खात्याच्या सायबर विभागाने बंद केलेले आहेत. फेक मेसेज प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
नाशिक शहरातील नागरिकांनी पाणीपट्टी व घरपट्टीबाबतच्या अफवा पसरवणाऱ्या मेसेज कडे दुर्लक्ष करावे व त्यास कुठलाही प्रतिसाद देऊ नये असे आवाहन मनपा आयुक्त मनीषा खत्री यांच्या वतीने करण्यात आले आहे. कर विभागाने ही अशा फसव्या मेसेज कडे दुर्लक्ष करण्याचं आवाहन करून कर विभागात खात्री करावी असे म्हटले आहे.







