होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

ठाकरे गटाचे नेते तथा माजी खासदार उन्मेश पाटील शिंदे गटात; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

On: March 31, 2026 6:56 PM
Follow Us:
---Advertisement---

Jalgaon News:  राजकरणात काही अशक्य नाही असे म्हटले जाते ते उगाच नाही, लोकप्रतिनिधींना लोकांची आणि आपल्या मतदार संघाची कामे मार्गी लावावी लागतात, त्यामुळे विरोधात बसून कामे होते नसल्याचा अनुभव हा बऱ्याच नेत्यांना देखील असावा.  तसेच जळगावातील शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते तथा माजी खासदार उन्मेश पाटील यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. त्या प्रवेशानंतर त्यांना कोणते पद दिले जाते, याकडे जळगाव शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे लक्ष लागून होते. अखेर शिंदे गटाने त्यांचा सन्मान करत, त्यांच्याकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी जबाबदारी दिली, त्यांची धाराशिव लोकसभा मतदार संघाच्या संपर्क प्रमुखपदी नियुक्ती झाली आहे. त्यांना मिळालेल्या या नव्या जबाबदारीने शिंदे गटात पाटील यांचे वजन वाढले आहे.

भाजपने उन्मेष पाटील यांना २०२४ मधील लोकसभा निवडणुकीत दुसऱ्यांदा उमेदवारी दिली नाही, त्यामुळे पाटील हे नाराज होते, अखेर उन्मेश पाटील यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला होता. यासोबत आपले मित्र करण पवार यांना त्यांनी ठाकरे गटाकडून लोकसभेची उमेदवारी देखील मिळवून दिली होती.या निवडणुकीत करण पवारांचा पराभव झाला. त्यांना ठाकरे गटातीला अंतर्गत कलहामुळे पराभव स्वीकारावा लागला होता, तेव्हापासून उन्मेष पाटील हे ठाकरे गटात नाराज होते.

त्यात विरोधात बसून कामे होत नाही याचा चांगला अनुभव पाटील यांच्या गाठीशी आहे. लोकांची कामे करण्यासाठी सत्ताधारी पक्षात असणे इतकेच महत्वाचे आहे, त्यामुळे पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करत त्यांच्यावर धाराशिव लोकसभा मतदार संघाच्या संपर्क प्रमुखपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. तसेच त्याच्या इत्तर शिलेदारांना विविध पदांवर सामावून घेतले जात असल्याने शिंदे गटाने त्याचा सन्मान केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. ठाकरे गटाच्या कार्यकमात अलीकडे ते दिसत नव्हते त्यांनी ठाकरे गटाशी अंतर राखल्याचे बोलले जात असतांनाच त्यांनी शिंदे गटात प्रवेशाने सर्वच आश्चर्य चकित झाले.

 

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

नऊ जणांच्या मृत्यूस कारणीभूत विहीर तातडीने बुजविणार: मंत्री गिरीश महाजन, मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रूपयांची मदत देणार

अवकाळी पाऊसाने पिके जमीनदोस्त, आ.प्रा.चंद्रकांत सोनवणें यांनी केली पिकाची पाहणी

खरातला मदत केली असेल तर व्हाल बडतर्फे; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा अधिकाऱ्यांना इशारा!

महाराष्ट्र चेंबरतर्फे उद्यापासून रंगणार व्यापारी क्रिकेट करंडक स्पर्धा; ९ दिग्गज संघ मैदानात!

Sinhastha Kumbhamela: द्वारका सर्कल आणि गोदा घाटावरील विकास कामांचा घेतला आढावा; राज्याचे मुख्य सचिव नाशिक दौऱ्यावर..

Railway To Run Special Trains: खान्देश वासियांनो लक्ष द्या! हटिया, संतरागाछीसाठी रेल्वे सोडणार विशेष गाड्या..

Leave a Comment