Mumbai News: राज्यात काही ठिकाणी पेट्रोल-डिझेल भरण्यासाठी वाहनधारकांच्या रांगा लागल्या आहे. त्यामुळे वाहनधारकांना इंधन मिळत नसल्याच्या तक्रारी येत आहे.मात्र राज्यभरात हीच परिस्थिती आहे, नागरिकांच्या तक्रारी लक्षात घेऊन शासनाने एका वक्तव्य जारी केले आहे. शासन टास्कफोर्सच्या माध्यमातून इंधन टंचाईवर नजर ठेवून आहे. याबाबत राज्य सरकारच्या पुरवठा विभागाने सांगितले की, राज्यात इंधनपुरवठ्याबाबत कोणतीही टंचाई नसून पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्या- हिंदुस्तान पेट्रोलियम (एचपीसीएल), भारत पेट्रोलियम (बीपीसीएल) आणि इंडियन ऑइल (आयओसीएल) यांच्या माध्यमातून राज्यभर इंधनाचे वितरण नियमित आणि सुरळीतपणे सुरू असल्याची, माहिती अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत देण्यात आली आहे. मात्र यानंतर देखील पेट्रोल पंपावर वाहनधारकांची गर्दी पाहावयास मिळत आहे.
राज्यातील इंधनसाठ्याची स्थिती समाधानकारक असल्याचे पुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे. तेल विपणन कंपन्यांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, २५ मार्च २०२६ रोजी राज्यातील इंधनसाठ्याची स्थिती समाधानकारक असून, पेट्रोलचा साठा 2,05,232 किलोलीटर, डिझेलचा साठा 4,67,603 किलोलीटर तर एलपीजीचा साठा 30,767 मेट्रिक टन इतका उपलब्ध आहे. हा साठा राज्याच्या गरजा पूर्ण करण्यास पुरेसा आहे. तसेच तेल रिफायनरींकडून एलपीजीच्या दैनिक उत्पादनात वाढ झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. तेल रिफायनरींकडून एलपीजीच्या दैनिक उत्पादनात वाढ करण्यात आली असून सर्व उत्पादक कंपन्या पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत. त्यामुळे तेल विपणन कंपन्यांना नियमितपणे पेट्रोलियम पदार्थांचा पुरवठा होत आहे आणि पुरवठा साखळीमध्ये कोणताही अडथळा निर्माण झालेला नाही.तसेच इंधन वितरण यंत्रणा प्रभावीपणे कार्यरत असलायचे त्यांनी सांगितले.
राज्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा व नियमित साठा उपलब्ध असून कोणत्याही प्रकारची टंचाई निर्माण झालेली नाही. इंधन वितरण यंत्रणा प्रभावीपणे कार्यरत असून संबंधित विभागांकडून सातत्याने देखरेख ठेवली जात आहे. याशिवाय, खासगी क्षेत्रातील कंपन्यांकडे देखील पेट्रोलियम पदार्थांचा साठा उपलब्ध असल्याने एकूण पुरवठा अधिक सक्षम झाला आहे. सद्यस्थितीत केंद्र व राज्य शासन इंधन पुरवठ्यावर पूर्ण नियंत्रण ठेवून परिस्थिती प्रभावीपणे हाताळत आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता शांतता व संयम राखून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत करण्यात आले आहे. पूरवठा विभाग परिस्थितीवर लक्ष ठेवून असले तरी ही सर्व स्थिती कधी सामान्य होईल असा सवाल सामान्य जनतेकडून उपस्थित केला जात.











