Mumbai News : वर्षांवर्ष त्याच खटारा बसेस बघण्याची सवय सामान्य जनतेला पडली आहे, कुठेही मध्येच बंद पडण्याचा अनुभव तर प्रत्येक नागरीकांच्या गाठी आहे.बसची जर्जर बसची अवस्था बघितल्यावर एसटीचा प्रवास नकोसा वाटतो, आतला एसटी हळूहळू कात टाकत आहे. शासनाने एसटीला आपल्या ताफ्यात नव्या कोऱ्या बसेस आणत आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात अत्याधुनिक सुविधांनी सज्ज ‘राजमाता जिजाऊ’ या बस सेवेचा लोकार्पण सोहळा पार पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या नव्या बस सेवेची आजपासून सुरुवात करण्यात आली. या नव्या उपक्रमांतर्गत सुमारे ३ हजार बसेस राज्यभरात टप्प्याटप्प्याने दाखल होणार आहे.
विधानभवनाच्या प्रांगणात पार पडलेल्या या सोहळ्यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, दोन्ही विधामंडळाचे सदस्य, परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक माधव कुसेकर, अशोक लेलँडचे वरिष्ठ व्यवस्थापक जॉन मॅथ्यू, टाटा मोटर्सचे ग्लोबल हेड सुशांत नाईक आदी उपस्थित होते.
‘राजमाता जिजाऊ’ बस सेवा
‘राजमाता जिजाऊ’ या नावाने सुरू करण्यात आलेली ही बस सेवा महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाची आठवण करून देणारी असून, राजमाता जिजाबाई यांच्या प्रेरणादायी कार्याला अभिवादन करणारी आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या राजमाता जिजाऊंच्या स्मरणार्थ ही बस सेवा सुरू करण्यात आली आहे. या नव्या उपक्रमांतर्गत सुमारे ३ हजार बसेस राज्यभरात टप्प्याटप्प्याने दाखल होणार असून, प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायी आणि आधुनिक प्रवासाचा अनुभव मिळणार आहे. एसटी महामंडळाच्या ताफ्यात यापूर्वी ‘शिवनेरी’, ‘शिवशाही’, ‘शिवाई’, ‘हिरकणी’ आणि ‘यशवंती’ अशा विविध सेवांचा समावेश असून, ‘राजमाता जिजाऊ’ ही बस सेवा त्या मालिकेत आणखी एक महत्त्वाची भर असणार आहे. या उपक्रमामुळे राज्यातील सार्वजनिक परिवहन अधिक सक्षम आणि प्रवासी-केंद्रित होण्यास मदत होणार आहे.
मुख्यमंत्री फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री श्रीमती पवार यांनी बसचे पूजन करून आणि फीत कापून या सेवेचा शुभारंभ केला. या बस सेवेचे लोकार्पण झाल्यानंतर उपस्थित मान्यवरांनी बसमधून प्रवास केला. यावेळी बसच्या समोर प्रतिकात्मक स्वरूपात घोड्यावर आरूढ झालेल्या राजमाता जिजाऊ यांच्या देखाव्यामुळे हा लोकार्पण सोहळा ऐतिहासिक आणि प्रेरणादायी ठरला. या योजनेच्या माध्यमातून प्रवाश्यांना मोठा दिलासा मिळणार असून प्रवास आनंदायी होण्यास मदत होणार आहे.











