होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

प्रतीक्षा संपली; ‘देऊळ बंद २’ २१ मे रोजी होणार प्रदर्शित; लेखक-दिग्दर्शक प्रविण तरडे यांची माहिती

On: April 3, 2026 5:22 PM
Follow Us:
---Advertisement---

Deul Band 2: सन २०१५ साली प्रदर्शित झालेल्या “देऊळ बंद” चित्रपटाला प्रेक्षकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला होता. अध्यात्म आणि विज्ञान यांची सांगड घालणारा, किंबहूना विज्ञानाचा आत्मा हा अध्यात्म आहे, हे अधोरेखित करणाऱ्या तसेच श्री स्वामी समर्थ महाराज आणि वैज्ञानिक यांच्या भोवती फिरणाऱ्या कथेने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली, त्यामुळे आजही “देऊळ बंद” आवर्जून बघितला जातो. “देऊळ बंद”चा अजून एक भाग यावा अशी इच्छा अनेक प्रेक्षकांनी व्यक्त केली होती आणि या इच्छेचा मान राखत लेखक, दिग्दर्शक प्रविण विठ्ठल तरडे यांनी “देऊळ बंद २” ची घोषणा केली होती. आज वटवृक्ष एंटरटेनमेंट निर्मित “देऊळ बंद २” चे डिजिटल पोस्टर समाज माध्यमांवर (सोशल मीडियावर) प्रदर्शित करण्यात आले आणि चित्रपट २१ मे २०२६ रोजी जगभरात प्रदर्शित होणार असल्याचे जाहीर झाले.

लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते प्रविण विठ्ठल तरडे म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीत वाजणारं खणखणीत नाणं आहे. त्यांनी लेखन आणि दिग्दर्शित केलेले देऊळ बंद, मुळशी पॅटर्न, सरसेनापती हंबीरराव, धर्मवीर, धर्मवीर २ या पाचही चित्रपटांना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले त्यामुळे या सर्व चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत अनेक रेकॉर्ड ब्रेक केले आणि “देऊळ बंद २” हा त्यांचा सहावा चित्रपट रसिकांच्या पसंतीस उतरेल यात काही शंकाच नाही व त्याचीच एक झलक डिजिटल पोस्टर मध्ये दिसून येते आहे. “आता परीक्षा देवाची ” असे उपशीर्षक असल्याने भक्तांसाठी देवाला कोणती परीक्षा द्यावी लागणार? याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे, तसेच कोणते कलाकार कुठल्या भूमिकेत असणार आहेत? हे गुलदस्तात असल्याने ते जाणण्यासाठी रसिकांना अजून थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

२१ मे २०२६ रोजी प्रदर्शित होणाऱ्या वटवृक्ष एंटरटेनमेंट निर्मित “देऊळ बंद २” चे लेखन आणि दिग्दर्शन प्रविण विठ्ठल तरडे यांनी केले असून निर्मिती कैलाश वाणी, जयश्री कैलाश वाणी, कैवल्य वाणी आणि जुईली वाणी सूर्यवंशी यांनी केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

Leave a Comment