होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

अन्न भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही, भेसळीला चाप लावण्यासाठी ‘हा’ मोठा कायदा लावणार!

On: March 23, 2026 7:55 PM
Follow Us:
---Advertisement---

Mumbai News: राज्यात अन्न भेसळ वाढले आहे. आता राजरोसपणे अन्न भेसळीचे प्रकार सुरू असून नागरिकांच्या जीवाशी खेळले जात आहे. नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या अशा लोकांवर जरब बसविण्याची गरज आहे. त्यामुळे अन्नात भेसळ करून जीवाशी खेळणाऱ्याना अद्दल घडवायला हवी या दृष्टीने महत्त्वाची बातमी समोर आली. आता राज्यातील अन्नसुरक्षा अधिक बळकट करण्यासाठी तपासणी मोहिमा अधिक व्यापक करण्यात येतील. अन्न पदार्थामध्ये भेसळ करणाऱ्यांविरुद्ध मकोका अंतर्गत कारवाई करण्यात येईल, असे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.

सदस्य डॉ. मनिषा कायंदे यांनी याविषयी विधान परिषदेत प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य भाई जगताप, ॲड. अनिल परब, अमोल मिटकरी आणि कृपाल तुमाने यांनी उपप्रश्न विचारत सहभाग घेतला. मंत्री झिरवाळ म्हणाले, वसई आणि अंधेरी परिसरात अन्न व औषध प्रशासनाने टाकलेल्या छाप्यात दुधातील भेसळ प्रकरणी १४ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. चार जणांना तडीपार करण्याची कार्यवाही सुरू आहे. अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ म्हणाले, मुंबईसह मोठ्या शहरांत बाहेरून येणाऱ्या दूध पुरवठ्यावर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. अन्न व औषध प्रशासनातील मनुष्यबळ वाढीसाठीही शासन प्रयत्नशील आहे. विभागाकडील पद भरतीसाठी वित्त विभागाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. विभागात अलीकडेच अन्न व औषध प्रशासन विभागात १९७ कर्मचाऱ्यांची भरती करून त्यांना प्रशिक्षणानंतर पदस्थापना देण्यात आली असल्याचेही मंत्री झिरवाळ म्हणाले.

सुगंधित सुपारी प्रश्नाच्या संदर्भात लवकरच बैठक घेतली जाईल, असेही मंत्री झिरवाळ यांनी सांगितले. दरम्यान दूध ,पनीर, इतर खाद्यपदार्थ, फळ, भाज्या यावर ही केमिकलचा वापरा सर्रास केला जात आहे.त्यामुळे खावे तर काय खावे असा प्रश्न सामान्य जनतेला पडला आहे,सातत्याने तपासणी मोहीम राबवून दोशींवर कठोर कारवाई केल्याशिवाय इतक्या गंभीर घटना रोखल्या जाऊ शकणार नाही. त्यामुळेच आता मकोका कायदा लावून भेसळीला चाप लावला जाणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

Leave a Comment