होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

---Advertisement---

America Iran War: राष्ट्रपती ट्रम्प म्हणाले, इराणशी राजनयिक चर्चा सुरू; इराण म्हणते विश्वासार्हता महत्त्वाची!

On: March 30, 2026 11:50 AM
Follow Us:
---Advertisement---

America Israel- Iran war: इराणशी डील शक्य असल्याचे अमेरीकन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम (Donald Trump) यांनी स्पस्ट केले आहे. राजनयिक संपर्क सुरू असल्याचे त्यांनी सांगून तसे संकेत दिले आहे. पाकिस्तान मध्यस्थ करत हे. नुकतीच पाकिस्तानची २० जहाजे इराणने (Hormuz Starit) होर्मुझ मधून जाऊ दिली. त्यामुळे ट्रम्प यांनी हे इराणशी संपर्क स्थापित करण्याचे प्रयत्न चालू असल्याचे सांगितले. इराणच्या राष्ट्रपतींनी देखील चर्चा होत असताना त्यात विश्वास असणे गरजेचे आहे. असे स्पष्ट केले. त्य

दरम्यान इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी इस्रायल सैन्याला लेबनॉन मध्ये घुसण्याचे आदेश दिले आहे. त्याप्रमाणे दक्षिण लेबनॉन मध्ये सैन्य धाडले असून त्याठिकाणी बफर झोन (Buffer Zone)तयार करण्यास सांगितले आहे. त्यामुळे आगामी काळात इस्रायल आणि लेबनॉन मध्ये तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. काही व्हिडिओ व्हायरल झाले असून त्यात इस्रायलचे सैन्य लेबनॉनमध्ये प्रवेश करत असल्याचा दावा केला जात आहे.

एफबीआय (FBI) संचालकांचे ईमेल हॅक

दरम्यान इराणी हॅकर्सनी अमेरिकेचे एफबीआय निर्देशक काश पटेल यांचे ईमेल हॅक केल्याचा दावा केला आहे. त्यात त्यांनी पटेल याचे काही व्हिडिओ आणि महत्त्वाची माहिती मिळवल्याचा दावा केला आहे. तसेच काही खाजगी फोटो आणि व्हिडिओचा समावेश आहे. यामुळे अमेरिकेत खळबळ उडाली असून अमेरिकेच्या सुरक्षा यंत्रणांना हा आव्हान असल्याचे मानले जात आहे.

अमेरिकेची जमिनी युद्धाची तयारी

दरम्यान अमेरिका आणि इस्रायल यांनी इराण सायन्स अँड टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटीवर हल्ला केला त्यात मोठे नुकसान झाले, शैक्षणिक संस्थेवर हल्ला केल्याने इराण संतापला आहे. जशास तसे उत्तर देऊ असा इशारा इराणच्या प्रवक्त्याने दिला आहे. तसेच अमेरिका जमिनी युद्धाची तयारी करत आहे, त्यांनी ३५०० अमेरिकन मरीन कमांडो युद्ध क्षेत्रात आणून ठेवले आहे. एमफिबीयस जहाजाद्वारे हे सैनिक युद्ध क्षेत्रात दाखल झाले आहे. मात्र अद्याप कारवाई बाबत अधिकृत स्पष्टता नाही.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment