होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

जागतिक क्षयरोग दिन: चला एकत्रित प्रयत्नातून क्षय रोगाला हरवू या!

On: March 24, 2026 12:00 PM
Follow Us:
---Advertisement---

World Tuberculosis Day: जागतिक क्षयरोग हा २४ मार्च १८८२ पासून साजरा केला जातो. या दिवशी बर्लिन येथील एक विज्ञान संस्थेत डॉ. रॉबर्ट कोच यांनी टुबोक्लोसिसवर एक व्याख्यान दिले, त्यात या संदर्भात केलेल्या संशोधनाचा त्यांनी निष्कर्ष सार्वजनिक केला, त्यानंतर तो १८ दिवसांनंतर साधारण तीन आठवड्यांनंतर प्रकाशित झाला. म्हणून १९८२ पासून, २४ मार्च हा जागतिक क्षयरोग दिन म्हणून ओळखला जातो. क्षयरोगास कारणीभूत असलेल्या जिवाणूचा शोध लावणाऱ्या डॉ. कोच यांच्याप्रती आदर व्यक्त करण्याचा ही दिवस या शोधाने लोकांना क्षयरोग समजून घेण्यास आणि त्यावर प्रभावी उपचार करण्यास मदत झाली. टीबी रोगाचा प्रसार रोखून त्याला प्रतिबंध घालणे आणि लोकांमध्ये जनजागृती करणे असा आहे. एकत्रित प्रयत्नातून क्षयरोगाला हरविण्याच्या दृष्टीने आरोग्य चळवळीला प्रारंभ करण्याचा दिवस.

जगभरातील टीबीला प्रतिबंध घालण्यासाठी प्रभावी जनजागृती करावी लागेल. त्यासाठी प्रबळ सामाजिक, राजकीय इच्छाशक्ती लागेल. या रोगापासून दूर राहण्यासाठी काय काळजी घ्यावी, याचे मार्गदर्शन द्यावे लागेल. लोकांमध्ये मोठी जागरूकता निर्माण करून मोहीम उघडावी लागेल. जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शनाप्रमाणे काम करावे लागेल. टीबीला जर हरवायचे असेल तर त्यासाठी अधिक दृढनिश्चय आणि वचनबद्धता अत्यावश्यक आहे. खास करून सध्याच्या भू-राजकीय परिस्थितीत टीबीसाठीच्या आंतरराष्ट्रीय निधीत होणारी घट हा चिंता निर्माण करणारा आहे, तरी ही २०३० पर्यंत टीबी निर्मूलनाचे जागतिक लक्ष्य गाठण्याचे एक मोठे आव्हान सर्वांसमोर आहे. (WHO) आरोग्य संघटना आपले प्रयत्न करत आहे, त्यांचे हात मजबूत करावे लागतील. जागतिक टीबी दिनाचे आयोजन, टीबी आजाराचे योग्यरीतीने निर्मूलन करण्यासाठी सातत्यपूर्ण गुंतवणूक आणि सह्योगाची आणि कृतीची जोड द्यावी लागणार आहे.

‘डब्ल्यूएचओ’च्या माहितीनुसार, युरोपियन प्रदेशामध्ये क्षयरोग (टीबी) औषध-प्रतिरोधक क्षयरोग (डीआर-टीबी), आणि टीबी-एचआयव्ही सह-संसर्ग हा सार्वजनिक आरोग्यासाठी मोठा धोका निर्माण करत आहेत, अकाली मृत्यूचे कारण ठरत आहेत. २०२३ मध्ये युरोपात टीबीच्या १,७२,३०० घटनांची नोंद झाली, ज्यात २२,५०० मृत्यू झाले. जागतिक स्तरापैकी टीबी रोगाचे या प्रदेशात केवळ २.१% प्रमाण आहे. असे असले तरी एमडीआर-टीबीचे प्रमाण सर्वाधिक गंभीर आणि प्रभावित ठरत आहे, जागतिक स्तरावरील एमडीआर-टीबीच्या एकूण रुग्णांपैकी पैकी २१ टक्के येथेच आहेत.

जागतिक आरोग्य संघटनेचे(WHO) क्षयरोग निर्मूलनासाठी प्रयत्न

जागतिक आरोग्य संघटनेनेे (WHO) सर्व स्तरांवर क्षयरोग (टीबी) संपुष्टात आणण्याचे लक्ष निर्धारित केले आहे. जागतिक क्षयरोग निर्मूलन धोरण आणि शाश्वत प्रगती यावर भर दिला आहे. त्यासाठी सदस्य राष्ट्रासाठी २०२३ ते २०३० असे क्षयरोग निर्मूलनासाठी कृती आराखडा बनवला आहे. त्यात क्षयरोगाला प्रतिबंध घालणे, त्याचे निदान करणे आणि त्यावर उपचार करून पुढील काळात त्याची काळजी कशी घेता येईल. असे निश्चित धोरण ठरविले आहे. त्यासाठी सर्वच देशांना या उपक्रमांमध्ये सहभागी करून घेत आहे. युरोपसह जगभरात सदस्य राष्ट्रांना क्षयरोग निर्मूलन करण्यासाठी मदत करत आहे. यासाठी निदान पद्धती, उपचार पद्धती आणि लसी यांसारख्या नवीन तंत्रज्ञानाचा, तसेच नवीन साधने, उपाययोजना आणि धोरणांचा अवलंब केला जात आहे. यामध्ये संपर्कात आलेल्या व्यक्ती आणि उच्च-जोखीम व असुरक्षित लोकसंख्येमध्ये क्षयरोगासाठी पद्धतशीर तपासणी वाढवली जाऊन जनजागृती केली जात आहे. नवीन जलद क्षयरोग निदान चाचण्या लागू करणे, आणि क्षयरोग प्रतिबंध व काळजीमध्ये अधिक प्रगती करण्यासाठी जलद व अधिक प्रभावी उपचार पद्धती सुनिश्चित करणे यांचा ही समावेश आहे. याव्यतिरिक्त, अधिक प्रभावी क्षयरोग लसी विकसित करण्यासाठी संशोधनला अधिक चालना दिली जात आहे.

हा दिवस केवळ लोकांना प्रतिबंधात्मक उपायांबद्दल शिक्षित करत नाही, तर जगभरात क्षयरोगावर नियंत्रण मिळवण्यातही त्याने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. जागतिक क्षयरोग दिनाची संकल्पना दरवर्षी वेगळी असते. प्रामुख्याने, ती जागतिक आरोग्य संघटनेद्वारे (WHO) ठरवली जाते. ‘होय! आपण क्षयरोग संपवू शकतो’ हे ब्रीदवाक्य प्रचलित झाले आहे. सर्व देशांच्या नेतृत्वाखाली आणि विविध संघटना व लोकांच्या बळावर २०२६ ची ही संकल्पना व्यापक जनजागृती करत आहे. जिचा उद्देश क्षयरोग संपवण्यासाठी सर्व समुदायांना एकत्र आणणे हा आहे. काही लोक याला ‘राष्ट्रीय क्षयरोग दिन’ असेही म्हणतात. त्यात विविध उपक्रम राबविण्याचा प्रयत्न आहे. क्षयरोग निर्मूलन मोहिमेत मोठया प्रमाणावर लोकांना सहभागी करून घेणे, सर्व देशांसह आरोग्य क्षेत्रातील नेते, संघटना आणि क्षयरोगातून बरे झालेल्या व्यक्तींना घेऊन व्हर्च्युअल टॉक शो आयोजित करण्यास प्रोत्साहन दिले जात आहे. दरवर्षी हा दिवस साजरा करण्याचा मुख्य उद्देश हा आहे की, वेळेवर उपाययोजना केल्यास टीबी टाळता येतो असा संदेश देणे होय.

टीबी रोगाला हरवण्यासाठी सर्वांना एकत्रित काम करावे लागेल, सरकारं, नागरी समाज, क्षयरोगग्रस्त लोक, देणगीदार, युवक, विकास बँका, तांत्रिक संस्था, संशोधक, खाजगी क्षेत्र इत्यादींच्या सामूहिक प्रयत्नांनी त्यावर मात करता येईल. त्यासाठी जागृती करणारे योग्य घोषवाक्य तयार करून त्याची त्याची प्रसिद्धी करणे आपण टीबी संपवू शकतो. पोस्टर तयार करुन सोशल माध्यमांतून स्लोगन आणि जनजागृती पर माहिती प्रसारित करू शकतो. विविध काम करणाऱ्या संस्थांना त्याच्या जनजागृती कामात मदत करू शकतो, सार्वजनिक चर्चा आणि जनजागृती निर्माण करू शकतो, सर्वांच्या प्रयत्नातून क्षयरोगाला आपण पराभूत करू शकतो.

भारत आणि महाराष्ट्र स्तरावर मोठे काम सुरू

क्षयरोग हा जगातील सर्वात गंभीर आजारांपैकी एक आहे. उपचार योजना उपलब्ध असूनही, दरवर्षी लाखो लोकांना, विशेषतः विकसनशील देशांमध्ये, याचा संसर्ग होतच राहतो.
जागतिक स्तरावर या आजाराचा मोठा भार भारतावर आहे. महाराष्ट्रात काम सुरू आहे. टीबी निर्मूलन कार्यक्रमांतर्गत २०२२ ते २०२५ या कालावधीत मुंबईत १ लाख ७५ हजार चाचण्या करण्यात आल्या. या काळात टीबीचे प्रमाण ११ टक्क्यांवरून ८ टक्क्यांपर्यंत खाली आले. तसेच औषध-प्रतिरोधक टीबी रुग्णांच्या उपचारासाठी बीपाल्म उपचार पद्धतीही कार्यान्वित करण्यात आली आहे.

सीबी-नॅट आणि ट्रू-नॅट या दोन्ही चाचण्या क्षयरोग निदानासाठी समान स्वरूपाचे कार्य करीत असल्याने, तसेच आवश्यकतेनुसार थुंकी तपासणी आणि स्पुटम स्मिअर मायक्रोस्कोपी नियमितपणे केली जात असल्याने निदान प्रक्रियेत कोणताही विलंब झाला नाही. पर्यायी सुविधा उपलब्ध करून रुग्णांचे वेळेत निदान व उपचार सुरू ठेवण्यात आले. केंद्र शासनाकडून जानेवारी २०२६ पासून सीबी-नॅट काट्रिजेसचा पुरवठा पुन्हा नियमितपणे सुरू झाला असून मुंबई महानगरपालिका क्षेत्रात आता कोणतीही कमतरता नसल्याचे मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले. आपण टिबी रोगाला हरवू शकतो असा आत्मविश्वास हा दिवस देतो.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment