होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

Ashok Kharat News: अशोक खरात प्रकरणी विजय वड्डेटीवार यांनी केली ‘ही’ मोठी मागणी, नेमके ते काय म्हणाले; जाणून घ्या!

On: March 30, 2026 3:03 PM
Follow Us:
---Advertisement---

Ashok Kharat News :खरात प्रकरण आता देशभर गाजत आहे. रोज नवनवीन खुलासे होत आहे. एसआयटीने खरात याच्या फोन मधून महत्त्वाचा डेटा बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे. या प्रकरणी अनेक अधिकारी आणि राजकारणी गोत्यात आलेले असतानाच एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलतांना काँग्रेसचे नेते आणि आमदार विजय वड्डेटीवार त्यांनी काही मोठे खुलासे केले, अनेक नेत्यांची नावे समोर येत असून वरिष्ठ अधिकारीही अशोक खरातच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे, पण जे व्हिडिओ पुढे येत आहेत, ते निवडक व्हिडीओ समोर येत आहेत. या प्रकरणी १००० च्या वर व्हिडिओ आहेत,असा दावा करतांच फक्त १५० च व्हिडिओ समोर आले. ज्या महिला यात दिसत आहेत, त्यांच्या पतींवर कारवाई झाली पाहिजे. आपल्या कुटुंबाला घेऊन ते तिथे गेले, मग तेही दोषी आहेत”, असं म्हणत पीडित महिलांच्या पतींवर कारवाईची मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे.

ते पुढे म्हणाले, हा खरात अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांना एक-दुसऱ्यांच्या फॅमिली शेअर करायचा. किती खालचं आणि घाणेरडा प्रकार होता. महाराष्ट्राच्या अस्मितेला संपवणं, महाराष्ट्राची इज्जत काढण्याचाचा प्रकार आहे. तरी देखील राज्यकर्त्यांना थोडीही लाज वाटत नाही, यापेक्षा दुर्दैवं काय? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. चाकणकर एकट्या नाहीत, केसरकर म्हणालेत की ३९ आमदार भेटले आहेत, माझं एकट्याचंच नाव का घेता? त्यामुळे हा आकडा १०० च्यावर जाईल. यात मंत्रीसुद्धा आहेत. चाकणकरांची चौकशी झाली पाहिजे असे सांगून त्यांनी इतरांचीही करा अशी मागणी केली आहे.

एकंदरीत खरात प्रकरणाने सामाजिक वातावरण ढवळून निघाले असून उच्च पदस्थ अधिकारी आणि बडे राजकारणी यांच्याशी असलेल्या संपर्कांचा फायदा घेऊन बुवाबाजीतून मोठी संपत्ती जमा की आहे. त्यास महसूल खात्यातील अधिकाऱ्यांनी मदत केली. त्यामाध्यमातून भोळ्याभाबड्या लोकांना दैवी अवताराच्या थापा मारून त्यांना लुटण्याचे काम केले. एसआयटीने त्याच्या मोबाइल आणि संगणकातून काही डेटा रिकव्हर केला आहे. तपासाअंती आणखी धागेदोरे हाती लागतील, आतापर्यत कोणाचीच चौकशी झाली नाही, रुपाली चाकणकर यांना एटीएसने आज चौकशीसाठी बोलावले आहे. परंतु चाकणकर हजार झाल्या नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

Leave a Comment