होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

खान्देशसह मध्य महाराष्ट्रात वादळी पाऊस आणि गारपिटीचा इशारा; आपत्ती व्यवस्थापन विभाग अलर्टवर

On: March 31, 2026 7:41 PM
Follow Us:
---Advertisement---

Mumbai News: भारतीय हवामान खात्याच्या ३० मार्च २०२६ रोजीच्या पाच दिवसीय अंदाजानुसार आज खान्देशसह मध्य महाराष्ट्रासह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वीज चमकणे, गारपीट आणि वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. मनुष्य अणे प्राणी जीवित हानी टाळण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाने काही सूचना पाळण्यास सांगितल्या आहे. पावसाचा मुक्काम वाढल्याने शेतकरी चिंतेत आहेत.

हवामान खात्याने दिलेल्या सूचनांनुसार, विजेचा कडकडाट ऐकू आला की तात्काळ घरात किंवा सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. झाडाखाली, शेतात, पाण्याजवळ किंवा लोखंडी वस्तूंच्या जवळ उभे राहणे टाळावे. मोकळ्या जागेत मोबाईल फोनचा वापर करू नये. तसेच निवाऱ्यापासून दूर असल्यास जमिनीवर न पडता पाय एकत्र करून बसून राहावे, असेही सांगण्यात आले आहे.

प्रशासनाने ग्रामपंचायत, पोलीस आणि आरोग्य विभागामार्फत तातडीने जनजागृती करण्याच्या सूचना दिल्या आहेत. रुग्णवाहिका व अग्निशमन दल सतर्क ठेवण्यात यावेत, तसेच शाळा, सभागृहे व सार्वजनिक इमारती सुरक्षित आश्रयस्थळ म्हणून खुले ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. हवामान खात्याचे अद्ययावत संदेश गावपातळीपर्यंत पोहोचवण्यावरही भर देण्यात आला आहे. दरम्यान, शेतकरी बांधवांनी विजेच्या इशाऱ्याच्या काळात शेतातील कामे टाळावीत, बांधकाम स्थळांवरील कामकाज तात्पुरते थांबवावे, तसेच यात्रास्थळे व मोठ्या जमावाचे कार्यक्रम तातडीने स्थगित करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे, असे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राच्या वत्तीने कळविण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

नऊ जणांच्या मृत्यूस कारणीभूत विहीर तातडीने बुजविणार: मंत्री गिरीश महाजन, मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रूपयांची मदत देणार

अवकाळी पाऊसाने पिके जमीनदोस्त, आ.प्रा.चंद्रकांत सोनवणें यांनी केली पिकाची पाहणी

खरातला मदत केली असेल तर व्हाल बडतर्फे; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा अधिकाऱ्यांना इशारा!

महाराष्ट्र चेंबरतर्फे उद्यापासून रंगणार व्यापारी क्रिकेट करंडक स्पर्धा; ९ दिग्गज संघ मैदानात!

Sinhastha Kumbhamela: द्वारका सर्कल आणि गोदा घाटावरील विकास कामांचा घेतला आढावा; राज्याचे मुख्य सचिव नाशिक दौऱ्यावर..

Railway To Run Special Trains: खान्देश वासियांनो लक्ष द्या! हटिया, संतरागाछीसाठी रेल्वे सोडणार विशेष गाड्या..

Leave a Comment