World Sprrow Day: इवलिशी चिमणी सर्वांच लक्ष पटकन वेधून घेते, चिमणीची चिव चिव ही आपल्याला निसर्गाच्या एक वेगळ्या जगाची अनुभूती देते, आता चिमणीचे मत्त्व संपूर्ण जगाला पटले आहे. जागतिक चिमणी दिन हा दरवर्षी २० मार्च रोजी साजरा केला जातो. खरे तर याची सुरुवात २०१० मध्ये ‘नेचर फॉरएव्हर सोसायटी ऑफ इंडिया’ आणि ‘इको-सिस्टिम ॲक्शन फाउंडेशन’ यांनी सुरू केल्याचेही म्हटले जाते. घरात चिमण्याचे घरटे असो की, शहरी भागातील पक्ष्यांना भेडसावणाऱ्या धोक्यांबद्दल जागरूकता निर्माण करणे हा या मागील उद्देश आहे. पेंटिग स्पर्धा, चिमण्यांच्या संवर्धनासाठी वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. अशा उपक्रमांना चालना देण्यासाठी, चिमणी बचाव मोहीम अधिक तीव्र करण्यासाठी, यावर मंथन करण्यासाठी एक फ्लॅटफॉर्म सर्व पशू पक्षी प्रेमींना उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे.
मनुष्याला जसा जगण्याचा जसा अधिकार आहे, तसाच अधिकार पशू पक्षी, आणि बारीक जीव डोळ्यांना दिसणारे दृश्य अदृश्य प्राणी त्यांचे ही महत्त्व आहेच, आपल्या पृथ्वीतलावर जिथे कुठे जीवसृष्टी आहे त्या ठिकाणी जैवविविधतेचे संरक्षण करण्याची जबाबदारी आपली आहे. जागतिक चिमणी दिनाचे सर्वांनी समजून घेण्याची आवश्यकता आहे. चिमणीला केवळ पक्षी म्हणून न बघता त्याकडे पर्यावरण संतुलन राखण्याच्या दृष्टिकोनातून बघणे गरजेचे झाले आहे. जीव सृष्टीवर परिणाम करणाऱ्या चिमणीला वाचवू या आणि पर्यावरण संवर्धन करूया. जगातील चिण्याचे झपाट्याने घटणारे प्रमाण सध्या चिंतेचा विषय आहे.
जगभरातील चिमण्यांच्या चिंताजनक घटत्या संख्येबाबत आता काही पर्यावरण संस्था आणि पशू प्रेमी यांनी जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. सर्वसामान्य जनतेची ही साथ असायला हवी चिमण्यांच्या घटत्या संख्येबाबत जागृती करणे, जैवविविधता आणि शहरी वन्यजीव संवर्धनाला प्रोत्साहन देणे, प्रत्यक्षात पशू पक्षी संरक्षणासाठी तशी जीवन शैली आपल्या अंगिकारावी गरजेचे झाले आहे. पतंग उडवतांना काळजी घ्यावी एखादी चिमणी किंवा पशू त्यामुळे घ्यायाळ होण्याचे प्रमाण ही अधिक आहे. शहरी भागातील गोंगाटामुळे ही चिमणी आढळत नाही. पूर्वी शहरी परिसरात चिण्यांचे घरटे बघायला मिळायचे, आता ते बघणे दुर्मिळ झाले, चिमण्यांची झपाट्याने घटणारी संख्या सगळ्यांसाठी चिंतेचा विषय आहे. जगलांचे झपाट्याने होणारे काँक्रीटीकरण पशू पक्षी आणि प्राणी यांच्या मुळावर आले आहे. संपूर्ण प्रजातीच नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
चिमण्यांचे सर्वधन आणि संरक्षण
चिमण्या या आपल्या घरातील सदस्य आहे, अशा प्रकारे त्याना आपण लळा लावू शकतो. त्यासाठी छोट्या छोट्या गोष्टीतून आपण त्यांचा विश्वास संपादन करू शकतो. आपल्या घर किंवा आजूबाजूच्या परिसरात घरटी बाधून त्यांना पाहुण्यासारखे आमंत्रित करू शकतो, त्यासाठी त्यांना रोज पाणी आणि खाद्य देऊन त्यांचा विश्वास संपादन करू शकतो. एकदा की विश्वास संपादन झाला की मग त्यांना आपल्यात मिसळायला वेळ लागत नाही. चिमणी असा छोटा पक्षी आहे जो प्रेम व लळा देणाऱ्या कोणाशी ही मैत्री करतो. सोशल मीडियावर एक पोस्ट खूप व्हायरल होत आहे. एक युवती छोट्या चिऊताईशी लाडाने बोलतेय आणि चिमणीला तिची भाषा समजतेय आणि ती रिस्पॉन्स देखील देतांना दिसते. त्या दोघींचे बोलणे मनाला भावल्याशिवाय राहत नाही. सांगायचा उद्देश एकच की सोशल माध्यमांतून आपल्याला अशा प्रकारे जनजागृती करता येते. तुम्ही ज्या ठिकाणी राहतात त्याठिकाणी पक्षांसाठी एखादे पिण्याचे भांडे ठेवावे जेणे करुन तहानलेले छोटे पशू आणि पक्षी याठिकाणी येऊन आपली तहान भागवतील, जागतिक चिमणी दिनाचे महत्त्व सांगणारे कार्यक्रम आयोजित करणे, मुलांमध्ये चिमणी आणि निसर्गाबद्दलचे शिक्षण देणे, चिमण्यांची संख्या वाढावी यासाठी घरटी उपलब्ध करुन देणे त्यांना आपल्या पिल्लांचे संगोपन करता येईल.
चिमणी वाचवा मोहिमेला २०१७ मध्ये पंतप्रधान मोदींनी यांनीही मोठा पाठिंबा देऊन जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. चेन्नईमधील ‘कुडुगल ट्रस्ट’चा आणखी एक उल्लेखनीय उपक्रम आहे. या संस्थेने शालेय मुलांना चिमण्यांची घरटी बनवण्याच्या कामात सहभागी करून घेतले आहे. ही मुले चिमण्यांसाठी लहान लाकडी घरे बांधतात ज्यामुळे त्यांची व्यवस्था होऊन, त्यांना अन्न आणि निवारा मिळतो. २०२० ते २०२४ या काळात ट्रस्टने १० हजारहून अधिक घरटी बांधली, ज्यामुळे चिमण्यांच्या संख्येत वाढ झाली. याबाबत कर्नाटकातील म्हैसूर येथील ‘अर्ली बर्ड’ मोहीम मुलांना पक्ष्यांच्या जगाची नवी ओळख करून देते.










