होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

आमा आदमी पक्षाला खिंडार, राघव चढ्ढासह ७ खासदार भाजपाच्या वाटेवर..

On: April 24, 2026 6:49 PM
Follow Us:
---Advertisement---

New Delhi: युद्धात आणी प्रेमात काही होऊ शकते तसे राजकारणाचे देखील झाले आहे. गेल्या अनेक दिवसापासून आम आदमी पक्षात नाराज असलेले अभ्यासू खा.राघव चढ्ढा यांनी ‘आप’ला रामराम ठोकला आहे. त्यांच्यसह इतर ७ खासदारानी देखील ‘आप’ला रामराम ठोकला आहे. राजकारणात कधी काय होईल याचा नेम नाही, ते यालाच म्हणतात. महाराष्ट्रामध्ये जे झाले ते आता दिल्लीत होत आहे. अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला खिंडार पडले आहे, आम आदमी पक्षातून राघव चढ्ढा यांच्यासह ७ खासदारांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. ७ ही खासदार भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. विशेष म्हणजे, आपकडे एकूण १० खासदार आहे, तर दोन तृतीयांश खासदार हे आपमधून बाहेर पडत असल्याने दिल्लीत देखील महाराष्ट्र पॅटर्न राबवल्याची चर्चा आहे. शिवसेना आणि राष्टवादी काँग्रेसचे दोन तुतीआंश आमदार फुटून त्यांनी वेगळा गट स्थापन केला होता.

आम आदमी पार्टीला खिंडार!

एके काळी दिल्लीत जम बसविलेल्या आम आदमी पक्षाला आता दिल्लीत आपला बूज राखण्याचे आव्हान आहे. दिल्ली आणि पंजाबात चांगले यश मिळविल्यावर सर्व काही सुरळीत सुरू असतानाच दिल्लीत अचानक आम आदमी पक्षात मोठी फूट पडल्याची वार्ता दिल्लीच्या राजकीय वर्तुळात पसरली. त्यामुळे राजकारणात घडलेल्या या घटनेने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. राघव चढ्ढा यांच्यासारखा अभ्यासू सदस्य भाजपाच्या गळाला लागल्याची चर्चा आहे. एकीकडे अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया नुकतेच कारागृहातून बाहेर आले आहे. तर दुसरीकडे आता ७ खासदारांनी पक्षाला रामराम ठोकत भाजपाकडे वाटचाल केली आहे. राज्यसभा खासदार अशोक मित्तल, राघव चड्ढा आणि संदीप पाठक यांनी पत्रकार परिषद घेऊन पक्षातून बाहेर पडत असल्याचे जाहीर केलं. त्यांच्यासोबत एकूण ७ खासदार आहेत, महाराष्ट्रातील शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉग्रेस सारखाच पॅटर्न राबविल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. ‘आप’चे देखील दोन तृतीयांश खासदार भाजपमध्ये सामील होणार आहे. दरम्यान अवघ्या १० दिवसांपूर्वीच अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) पथकांनी पंजाबमधील जालंधर व गुरुग्राम येथील खासदार अशोक मित्तल यांच्या अनेक निवासस्थानांवर एकाच वेळी छापे टाकले होते.

गट स्थापन करणार?

सात ही खासदार हे भाजपात प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे, महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारे शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये दोन तृतीयांश आमदार फुटून वेगळा गट स्थापन केला होता, तशीच परिस्थिती आता आपमध्ये निर्माण झाली आहे. कायदेशीर अडचण किंवा १० व्या सुचीनुसार पक्षांतर बंदीच्या कायद्यातून पळवाट काढत हा आपने फॉर्म्युला शोधला आहे. त्यामुळे दोन तृतिआंश खासदारांचा गट स्थापन करण्याची शक्यता आहे.

आपमध्ये एकूण १० खासदार आहे, त्यापैकी बरोबर ७ खासदार फुटले आहे.राघव चड्ढा, संदीप पाठक, राजेंद्र गुप्ता, विक्रम साहनी, स्वाती मालीवाल, हरभजन सिंग, अशोक मित्तल यांचा समावेश आहे. दोन तृतीयांश खासदारांची संख्या झाली आहे. आपकडे आता ३ खासदार उरले आहे. कोणत्याही पक्षामध्ये फूट पडल्यावर त्या गटाला अपात्रतेची कारवाईपासून वाचण्यासाठी दोन तृतीयांश आकडा लागतो. आता आपमध्ये बरोबर ७ खासदार फुटले आहे, त्यामुळे या खासदारांवर पक्षांतर बंदी अंतर्गत कारवाई होणार नाही. महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारे शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये दोन तृतीयांश आमदार फुटून वेगळा गट स्थापन केला होता, तसे ही येथे होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याचे पदही सुरक्षित रहाणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment