होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

अमळनेरला गुडघा-खांदा आजारांवर तज्ज्ञ उपचारांची सुविधा; येत्या मंगळवारी प्रसिद्ध डॉ. पियुष वसईकर यांची सेवा उपलब्ध

On: May 4, 2026 11:23 AM
Follow Us:
---Advertisement---

Amalner News: अमळनेर तालुक्यातील रुग्णांसाठी आता मोठा दिलासा मिळाला असून गुडघा, खांदा,मणका तसेच हाडांच्या विविध आजारांवर व संधिवातावर तज्ज्ञ उपचारांची सुविधा अमळनेर येथे उपलब्ध झाली असून प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. पियुष सुरेश वसईकर यांची सेवा दर महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या मंगळवारी उपलब्ध राहणार आहे.

येत्या मंगळवार, दि. 5 मे 2026 रोजी डॉ. वसईकर अमळनेर मध्ये उपलब्ध आहेत. आर्थोस्कोपी व कृत्रिम सांधेरोपण (जॉईंट रिप्लेसमेंट) क्षेत्रातील विशेष प्राविण्य असलेले डॉ. वसईकर हे गुडघ्यातील सतत वेदना, चालताना त्रास, जिना चढताना अडचण, सांधे लॉक होणे, खांद्याची हालचाल करताना वेदना तसेच संधिवात यांसारख्या आजारांवर तपासणी व अत्याधुनिक उपचार करणार आहेत.

रुग्णांकरिता ही सुविधा धन्वंतरी हॉस्पिटल तसेच दीपक मेडिकल, धुळे रोड, अमळनेर येथे उपलब्ध असून दिवसभर रुग्णांची तपासणी केली जाणार आहे. रुग्णांनी पूर्वनोंदणी करून यावे. पूर्व नोंदणीसाठी धन्वंतरी मेडिकल (सकाळी 10 ते दुपारी 12 या वेळेत), दीपक मेडिकल येथे (सकाळी 11 ते दुपारी 1या वेळेत) असून सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी येणाऱ्या रुग्णांसाठी केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment