Good News For Tourest: सध्या उन्हाळयाच्या सुट्ट्या सुरू आहे, त्यामुळे सुट्टीत पर्यटक फिरायला प्राधान्य देत आहे, विशेषतः उन्हाळयात थंड हवेच्या ठिकाणी फिरणे पसंत करतात, सध्या राज्यातील अनेक जिल्ह्याचे तापमान चाळीशी गाठत असतांना दुसरीकडे राज्यातील थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेले महाबळेश्वर पर्यटकांना राईट चॉईस ठरत आहे.
तसेच गोव्यात देखील तापमान कमी आहे, गोव्याचे तापमान ३५ अशांवर आले आहे. गेले दोन दिवस येथील तापमान ही ३३ ते ३५ दरम्यान स्थिर आहे, महाबळेश्वरचा पारा दोन दिवस घसरला मात्र आज तापमानात किंचित वाढ झाली आहे. (Mahabaleshwar) आज महाबळेश्वरचे तापमान ३२.७ अंश होते, तर सोमवारी तापमान बुधवारी ३३.२ अंश नोंदवले गेले, त्यामुळे महाबळेश्वरमध्ये पर्यटकांना साजेशे वातावरण आहे. हवेत गारवा असल्याने पर्यटक या ठिकाणाला पसंती देत आहेत.(Letest Weather News)
उन्हाळ्यात कोणत्या पर्यटनस्थळी जावे असा प्रश्न जर कोणाला पडला असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. राज्यात आणि राज्याबाहेर पर्यटकाना फिरण्यासाठी किंवा उन्हाळ्याची सुट्टी आनंदात घालवण्यासाठी महाबळेश्वर आणि गोवा ही दोन पर्यटनस्थळे फिरण्यास चांगली आहे. राज्यात तापमाने उच्चांक गाठला असतांना महाबळेश्वर मात्र या पासून दूर आहे येथील तापमान पर्यटकांना साजेशे आहे.
त्यामुळे राज्यातील महाबळेश्वर सोबत गोवा देखील पर्यटकांना चांगला पर्याय आहे. त्यामुळे पर्यटकांनो या दोन्ही पर्यटनस्थळी बिनधास्त फिरायला जा आणि पर्यटनाचा आनंद घ्या. (Goa) महाबळेश्वर आणि गोवा या दोन पर्यटन स्थळांचे तापमान खाली दिले आहे.
महाबळेश्वरचे तापमान-गोव्याचे तापमान (Ansh Selsius)
सोमवार ३२.८ ३५.८
मंगळवार ३२.१ ३४.२
बुधवारी ३३.२ ३३.२
गुरुवार ३१.७ ३५.६









