Jalgaon News: अक्षय्य तृतीयेनंतर सोमवारी सोने बाजार खुला झाला तेव्हा सोने आणि चांदी या देन्हीच्या भावात घसरण झाली, सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्या-चांदीच्या जागतिक आणि देशांतर्गत बाजारात घसरण पाहायला मिळाली. जळगावच्या सराफ बाजारात सोन्याच्या दरात ८०० रुपयांची, तर चांदीच्या दरात सुमारे ५ हजार रुपयांची मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे टप्याटप्याने येणाऱ्या सणासुदीच्या काळात दर स्थिर राहिल्यावर या दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमती उतरल्याचे दिसत आहे. (Silver And Gold)
अक्षय्य तृतीयेला सोन्याच्या किंमती स्थिर होत्या, सणाचा काळ लोटत नाही तोच सोने आणि चांदीच्या दारात घसरण पाहायला मिळत आहे. तसेच जळगाव सराफ बाजारातुन मिळालेल्या माहिती नुसार, आज सोन्याचे दर (GST) जीएसटीसह १ लाख ५६ हजार ६५० रुपये (प्रति १० ग्राम) वर गेले आहे, तर दुसरीकडे, चांदीच्या दरात 5 हजार रुपयांची घसरण झाली आहे. चांदीचा भाव आता जीएसटीसह २ लाख ६२ हजार ६५० रुपये (प्रति किलो) इतका आहे.
ज्यांना अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करता आली नाही त्यांना आज चालून आली आहे. (Silver And Gold)
सोमवारी (MCX) वर सोने आणि चांदी किमतीत घसरण झाली. सकाळी बाजार सुरू होताच सोन्याचा वायदा भाव १.०३ टक्क्यांच्या घसरणीसह १,५३ ०१८ रुपयांवर ट्रेड करत होता. तर ५ मे २९२६ च्या एक्सपायरी वाला चांदीचा वायदा भाव सुमारे ५,११० रुपयांनी (१.९९ %) घसरून २,५३,४५३ रुपयांवर व्यवहार करत होता.








