Mumbai News: राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या असून त्यात ९ पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तर जळगावच्या पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी (Maheshawar Reddy) यांची बदली राज्य गुन्हे अन्वेषण विभागात झाली असून त्याच्या जागी धुळे येथील श्रीकांत धिवरे यांची पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती झाली आहे. (Shrikant Dhivre) धिवरे हे धुळ्याला पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होते. तसेच आयपीएस अधिकारी तुषार दोषी (Tushar Doshi) यांची सातारच्या पोलीस अधिक्षक पदावरून सांगलीचे पोलीस अधीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे.
दरम्यान सातारा झेडपी अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत पालकमंत्री शंभुराजे देसाई यांना सातारा पोलीसांनी मारहाण केल्याचा आणि पोलिसांच्या मदतीने भाजपने जिल्हा परिषदेची सत्ता काबीज केल्याचा आरोप महायुतीतील सत्ताधारी शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे करण्यात आला होता. त्यानंतर विधिमंडळात विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी दखल घेऊन तुषार दोषी यांच्यावर कारवाईची शिफारस केली. या बदलीची चर्चा राज्यभर आहे.
राज्यातील नऊ आयपीएस अधिकाऱ्यांच्या सोमवारी बदल्या करण्यात आल्या आहेत. जिल्हा परिषद निवडणुकीत वादग्रस्त ठरलेले सातारचे पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली सांगलीत करण्यात आली आहे.
आयपीएस अधिकाऱ्यांचे नाव, सध्याचे ठिकाण, बदलीचे ठिकाण
महेश्वर रेड्डी – पोलीस अधीक्षक, जळगाव – पोलीस अधीक्षक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे
श्रीकांत ढिवरे – पोलिस अधीक्षक, धुळे – पोलीस अधीक्षक, जळगाव
राजकुमार शिंदे – पोलिस उपायुक्त, पुणे – पोलीस अधीक्षक, वाशिम
तुषार दोशी – पोलिस अधीक्षक, सातारा – पोलीस अधीक्षक, सांगली
निखील पिंगळे – पोलिस उपायुक्त, पुणे – पोलीस अधीक्षक, सातारा
संदीप घुगे – पोलिस अधीक्षक, सांगली – पोलीस उपायुक्त, सुरक्षा राज्य गुप्तवार्ता, मुंबई
योगेश गुप्ता – पोलिस अधीक्षक, कोल्हापूर – पोलीस उपमहानिरीक्षक, गडचिरोली परिक्षेत्र
नीलोत्पल – पोलीस अधीक्षक, गडचिरोली – पोलीस अधीक्षक, कोल्हापूर
महेश्वर रेड्डी – पोलीस अधीक्षक, जळगाव – पोलीस अधीक्षक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे
श्रीकांत ढिवरे – पोलिस अधीक्षक, धुळे – पोलीस अधीक्षक, जळगाव
राजकुमार शिंदे – पोलिस उपायुक्त, पुणे – पोलीस अधीक्षक, वाशिम






