होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

Dhule News: गर्भपाताच्या गोळ्यांच्या अतिसेवनाने अविवाहित तरुणीचा मृत्यू

On: April 15, 2026 2:20 PM
Follow Us:
---Advertisement---

Dhule News: धुळे शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. गर्भपाताच्या अधिक गोळ्यांचे सेवन केल्याने एक अविवाहित तरुणीचा मृत्यू झाला आहे. धुळे शहरापासून जवळच असलेल्या एका गावात हा धक्कादायक प्रकार घडला. मृत तरुणी सहा महिन्यांची गरोदर असल्याचे वैद्यकीय तपासणीत समोर आले आहे. मृत १८ वर्षीय तरुणीस देवपुरातील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. डॉक्टरांनी तपासल्यावर मुलगी गरोदर असल्याचे समजले. अविवाहित तरुणीच्या मृत्यू प्रकरणी मोहाडी पोलिसांत नोंद केली आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित १८ वर्षीय तरुणी ही धुळे शहरापासून जवळ असलेल्या एका गावातील रहिवसी होती. तिची अचानक प्रकृती खालावल्यामुळे देवपुरातील एका खासगी रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी तपासणी केली असता, ती तरुणी २४ आठवड्यांची (६ महिने) गरोदर असल्याचे निष्पन्न झाले. गरोदरपणा लपवण्यासाठी किंवा गर्भपात करण्यासाठी तिने काही औषधांचे सेवन केले होते, अशी माहिती डॉक्टरांनी तिच्या कुटुंबीयांना दिली.

 

गर्भपाताच्या गोळ्यांचे प्रमाण अधिक झाल्यामुळे तरुणीचा रक्तदाब वेगाने कमी झाला आणि तिला झटके येऊ लागले. तिची प्रकृती चिंताजनक झाल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तिला तातडीने हिरे शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. तेथील अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना तरुणीची प्राणज्योत मालावली.

 

या घटनेची माहिती मिळताच मोहाडी पोलिसांनी रुग्णालयात धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणी सध्या अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. मात्र, इतक्या मोठ्या कालावधीचा गर्भ पाडण्यासाठी तिला गोळ्या कोणी दिल्या? तो तरुण कोण होता? आणि यामागे कोणाचे रॅकेट आहे का? याचा तपास आता पोलिसांनी सुरू केला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment