होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

कुंभमेळ्यासाठी ‘शून्य सहनशीलता’ धोरण; रेल्वे महाव्यवस्थापकांनी घेतला विकास कामांचा आढावा!

On: April 23, 2026 12:01 PM
Follow Us:
---Advertisement---

Bhusaval News: अवघ्या वर्षभरावर येऊन ठेपलेला कुंभमेळ्याची तयारी नाशिकमध्ये जोरात सुरू आहे, शहरातील पायाभूत सुविधा आणि इतर विकास कामे सुरू आहेत. रेल्वेची देखील कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहे. नाशिकमधील कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रवाशांना सुरक्षित आणि सोयीस्कर सेवा उपलब्ध करून देण्यासाठी मध्य रेल्वेकडून युद्धपातळीवर तयारी सुरू आहे. या अनुषंगाने मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राजीव श्रीवास्तव, यांनी भुसावळ विभागाचे रेल्वे व्यवस्थापक पुनीत अग्रवाल यांच्यासोबत कुंभ मेळा कामांचा आढावा घेतला.

देवळाली, नाशिक रोड, ओढा, खेरवाडी आणि कसबे सुकेणे या महत्त्वाच्या स्थानकांना तसेच एकलहरा सायडिंग येथे त्यांनी भेट दिली. प्रवासी सुविधा, सुरक्षा व्यवस्था, गर्दी नियंत्रण उपाययोजना तसेच पायाभूत सुविधांची तयारी यांची त्यांनी माहिती घेतली.

महाव्यवस्थापकांनी संबंधित अधिका-यांना सर्व कामे वेळेत आणि उच्च दर्जाने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. कुंभ मेळ्यादरम्यान येणा-या भाविकांच्या मोठ्या गर्दीचा विचार करून “शून्य सहनशीलता” धोरणाने सुरक्षा व प्रवासी सुविधा सुनिश्चित करण्यावर भर देण्यास त्यांनी सांगितले.

कुंभ मेळ्यादरम्यान अपेक्षित असलेल्या भाविकांच्या वाढत्या गर्दीचे सुरळीत व सुरक्षितरित्या व्यवस्थापन करण्यासाठी आवश्यक तयारी पूर्ण ठेवण्याच्या दृष्टीने या दौ-याचे आयोजन करण्यात आले.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment