Jalgaon News: संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त प्रमुख नागरिक संघोष्टीचे दि. १८ ते २० एप्रिल २०२६ दरम्यान संघाच्या अखिल भारतीय कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत जळगाव, भुसावळ, चाळीसगाव व अमळनेर येथे आयोजन करण्यात आले आहे. दि.१८ एप्रिल रोजी भुसावळ येथील जळगाव रोडवर प्रभाकर हॉल येथे संध्याकळी ४.३० वाजता होणार आहे. तर दि. १९ एप्रिल रोजी जळगाव येथील भैयासाहेब गंधे बहुद्देशीय सभागृहात सायंकाळी ६ ते ८.३०. हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला हैदराबाद भाग्यनगर केंद्राचे प्रचार प्रमुख सुनील जी आंबेकर आणी संघाचे वरिष्ठ प्रचारक रामलालजी हे उपस्थित राहणार आहे.
तसेच डॉक्टर, इंजिनिअर, वकील, धार्मिक, कृषी, सामाजिक, प्रशासकीय, पर्यावरण प्रेमी, आर्थिक, उद्योजक, व्यापारी, अनुसूचित जाती व जमाती, प्रींट मिडिया संपादक व सोशल मीडिया ईन्फ्लुएंसर या क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. संघाकडून वरिष्ठ प्रचारक रामलाल जी उपस्थित राहणार आहे, त्यांनी यापूर्वी १३ वर्षे राष्ट्रीय संघटन मंत्री भा.ज.पा. म्हणून काम बघितले आहे. सध्या रा. स्व. संघाचे अखिल भारतीय संपर्क प्रमुख आहेत.
तसेच चाळीसगाव येथील भडगाव रस्त्यावर पाटीदार भवन येथे दि. १९ एप्रिल रोजी सायंकाळी ६ ते ९ या वेळेत होणार आहे तर अमळनेर येथे सोमवारी दि.२० एप्रिल रोजी मारवाड रोड प्रताप कॉलेज गेट नं. २, कै. काकासाहेब शंकरराव राणे सभागृहात सायंकाळी ५ वा. संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त प्रमुख नागरिक संघोष्टीचे आयोजन होणार असल्याचे कळविण्यात आले आहे.
या कार्यक्रमाला अमळनेर, पारोळा, धरणगाव, एरंडोल व जवळच्या परिसरातील डॉक्टर, इंजिनिअर, वकील, धार्मिक, कृषी, सामाजिक, प्रशासकीय, पर्यावरण प्रेमी, आर्थिक, उद्योजक, व्यापारी, अनुसूचित जाती व जमाती, प्रींट मिडिया संपादक, रिक्षा युनियन व सोशल मीडिया ईन्फ्लुएंसर या क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. संघाकडून प्रमुख उपस्थिती म्हणून हैदराबाद भाग्यनगर केंद्राचे प्रचार प्रमुख सुनील जी आंबेकर हे असतील, त्यांनी यापूर्वी १२ वर्षे राष्ट्रीय संघटन मंत्री म्हणून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदचे काम सांभाळले आहे.








