Bhusaval News: उन्हाळ्याच्या हंगामात प्रवाशांच्या अधिक सोयीसाठी रेल्वे लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई आणि सुलतानपूर- वाराणसी दरम्यान ३४ अतिरिक्त उन्हाळी विशेष सेवा चालवणार आहे. उन्हाळ्याची गावाला जाणाऱ्या प्रवाश्यांची गर्दी वाढत आहे, विशेषतः महिला आणि लहान मुलांचे मोठे हाल होतात, म्हून प्रवाश्यांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी विशेष रेल्वे सेवा चालवलय जाणार आहे.
लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई – सुलतानपूर – लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई साप्ताहिक विशेष (१८ सेवा) असून गाडी क्रमांक 04211 ही साप्ताहिक विशेष दिनांक २१ मे ते १७ जुलै २०२६ पर्यंत दर गुरुवारी लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून १४:३५ वाजता सुटेल आणि सुलतानपूर येथे दुसऱ्या दिवशी २३:०० वाजता पोहोचेल (९ सेवा).
गाडी क्रमांक 04212 साप्ताहिक विशेष दि. २० मे ते १५ जुलै २०२६ पर्यंत दर बुधवारी सुलतानपूर येथून ०४:०० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी १२:२० वाजता पोहोचेल. (9 सेवा) असणार आहे. गाडीला थांबे:- ठाणे, कल्याण, नाशिक रोड, चाळीसगाव, पाचोरा, भुसावळ, खंडवा, इटारसी जंक्शन, राणी कमलापती, बीना, वीरांगना लक्ष्मीबाई झाशी, ओरई, कानपूर सेंट्रल आणि लखनऊ असे असतील.
लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई – वाराणसी – लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई साप्ताहिक विशेष (१६ सेवा) असणार आहे, गाडी क्रमांक 04225 साप्ताहिक विशेष दिनांक २२ मे ते १०.जुलै २०२६ पर्यंत दर शुक्रवारी लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून १४:३५ वाजता सुटेल आणि वाराणसी येथे तिसऱ्या दिवशी ०२:०५ वाजता पोहोचेल (८ सेवा) असणारा आहे.
गाडी क्रमांक 04226 साप्ताहिक विशेष दिनांक २१.फेब्रुवारी ते ०९ जुलै.२०२६ पर्यंत दर गुरुवारी वाराणसी येथून ०१:३५ वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी १२:२० वाजता पोहोचेल (८ सेवा) असणार आहे.गाडीला थांबे:- ठाणे, कल्याण, नाशिक रोड, चाळीसगाव, पाचोरा, भुसावळ, खंडवा, इटारसी जंक्शन, राणी कमलापती, बीना, वीरांगना लक्ष्मीबाई झाशी, ओरई, कानपूर सेंट्रल, लखनऊ, सुलतानपूर आणि जौनपूर सिटी असे असतील. गाडी क्रमांक 04211/ 04212 आणि गाडी क्रमांक 04225/ 04226 साठीची संरचना: १४ वातानुकूलित तृतीय इकॉनॉमी, ४ सामान्य द्वितीय श्रेणी आणि २ जनरेटर व्हॅन असे आहे.
आरक्षण: विशेष गाडी क्रमांक 04211 आणि गाडी क्रमांक 04225 साठी बुकिंग सुरू आहे. सर्वसाधारण शुल्कासह अनारक्षित डब्यांचे बुकिंग यूटीएस (UTS) प्रणालीद्वारे करता येईल. प्रवासी तिकीट बुकिंगसाठी रेलवन (RailOne) ॲपचा वापर देखील करू शकतात. तसेच गर्दीच्या काळात प्रवाश्यांनी रेल्वेच्या अतिरिक्त सोडण्यात येणाऱ्या गाड्यांचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.






