होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

भोंदूबाबा अशोक खरातला डोकेदुखीचा त्रास, उपचारासाठी न्यायालयाला केली ‘ही’ विनंती!

On: April 19, 2026 4:03 PM
Follow Us:
---Advertisement---

Ashok Kharat Case: दैवी शक्तीच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण करणारा नराधम भोंदूबाबा अशोक खरात याचा तुरुंगातील मुक्काम वाढला आहे. महिला अत्याचाराच्या पाचव्या गुन्ह्यात विशेष तपास पथकाने (एसआयटी) ताबा घेतल्यानंतर, भोंदूबाबा खरातला आज न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने आरोपी अशोक खरातला २३ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.(Ashok Kharat)

आरोपीच्या खांद्याची सर्जरी झाली असून त्याचे डोकेही दुखत आहे, पेनकिलर गोळ्या, औषधांनी त्याला फारसा फरक पडत नसल्याने वैद्यकीय तपासणीसाठी मेंदूविकार तज्ञांकडे घेऊन जावे लागणार आहे. त्यासाठी नवीन अर्ज करण्याची गरज भासू नये, अशी विनंती आरोपीच्या वकिलांनी केली. त्यावर न्यायाधीशांनी पोलिसांना आवश्यक ते औषधोपचार करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

अनेक पिडीतांनी पोलिसांशी संपर्क करून खरात विरुद्ध तक्रारी केल्या आहे, तसेच त्याच्या विरोधात एकूण १२ गुन्हे यापूर्वीच दाखल केले आहे. त्यामुळे एका प्रकरणात न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर लगेच दुसऱ्या गुन्ह्यात त्याच्या पोलीस कोठडीची मागणी सरकारी पक्षाकडून केली जात आहे.खरातच्या सर्व लैगिक छळवणूक प्रकरणाची एसआयटी कसून चौकशी करत आहे. आज त्याला सुरक्षेच्या कारणास्तव पुन्हा एकदा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या (VC) माध्यमातून न्यायालयात हजर करण्यात आले होते.

यावेळी सरकारी वकिलांनी न्यायालयाला सांगितले. आरोपीची गुन्हे करण्याची पद्धत एक असली तरी पीडित महिला वेगवेगळ्या आहेत. महिलांना गुंगीचे पदार्थ खाऊ घालून आणि फसवणूक करून त्यांच्यावर अत्याचार केले. संबंधीत द्रव्यांचा आणि गुन्ह्यामागच्या कटाचा सखोल तपास करण्यासाठी पोलीस कोठडीची आवश्यकता आहे, असे न्यायालयात सरकारी पक्षाने युक्तिवाद केला. त्याला आरोपीच्या वकिलांनी विरोध केला. त्यांनतर न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून खरातला २३ एप्रिलपर्यंत ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

 

 

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment