होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा सुरू करण्याच्या कराराचे अमेरिकेकडून उल्लंघन: इराणचा आरोप; ‘आयआरजीसी’ने होर्मूझवर पुन्हा लादले निर्बंध

On: April 18, 2026 3:21 PM
Follow Us:
---Advertisement---

America- Iran conflict: अमेरिका आणि इराण यांच्यात शुक्रवारी युद्धबंदीच्या निर्णयानंतर पुन्हा अमेरिका आणि इराण यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे. अमेरिकेने इराणशी संबंधित जहाज वाहतुकीवरील नाकेबंदी संपवणार नसल्याचे जाहीर केल्याने इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा उघडण्याचा निर्णय मागे घेतला आहे. तसेच शनिवारी या महत्त्वपूर्ण जलमार्गावर पुन्हा निर्बंध लादले, असे वृत्त असोसिएटेड प्रेसने दिले आहे. त्यामुळे युद्धबंदीचा निर्णय पुन्हा लांबणीवर पडण्याची चिन्हे असून होर्मूझचा तिढा कायम आहे. तेल आणि व्यापारी वाहतुकीचा प्रश्न आणखी चिघळून ऊर्जा संकट वाढणार आहे.

दरम्यान इराणच्या संयुक्त लष्करी कमांडने शनिवारी सांगितले की, “सशस्त्र दलांच्या कडक व्यवस्थापन आणि नियंत्रणाखाली होर्मुझच्या सामुद्रधुनीवरील नियंत्रण पूर्वीच्या स्थितीत परत आले आहे.” जोपर्यंत इराणच्या बंदरांवरील अमेरिकेची नाकेबंदी लागू राहील, तोपर्यंत या सामुद्रधुनीतून होणारी वाहतूक रोखली जाईल, असा इशारा इराणने दिला. ही घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी करण्यात आली. ट्रम्प यांनी म्हटले होते की, शुक्रवारी इराणने सामुद्रधुनी पुन्हा उघडण्याची घोषणा केली असली तरी देखील, जोपर्यंत तेहरान अमेरिकेशी, त्याच्या अणुकार्यक्रमासह, इतर करार करत नाही, तोपर्यंत अमेरिकेची नाकेबंदी लागू राहील” असे सांगितले होते. त्यांच्या प्रतिक्रियेनंतर इराणने देखील आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

अमेरिका आणि इराण यांच्यात करार होण्याची शक्यता असतांनाच पुन्हा वादंग निर्माण झाला असून जगाच्या आशेवर पाणी फेरले गेले, शुक्रवारी तेलाच्या किमती पुन्हा घसरू लागल्याने, या महत्त्वाच्या जलमार्गावरील तिढा कायम असून जगाच्या अर्थव्यवस्थेला त्याचा फटका बसला आहे. त्याने उर्जा संकटात आणखी भर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जगातील सुमारे एक-पंचमांश तेल या सामुद्रधुनीतून जाते आणि आणखी निर्बंध लादल्यास आधीच मर्यादित असलेल्या पुरवठ्यावर आणखी ताण येणार आहे. त्यामुळे तेलाच्या किंमती आणखी वाढण्याची शक्यता आहे.

तत्पूर्वी, इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अरागची यांनी सांगितले होते की, “लेबनॉनमधील युद्धविरामाच्या अनुषंगाने” आणि “आधीच जाहीर करण्यात आलेल्या समन्वित मार्गावरून,” ही सामुद्रधुनी सर्व व्यापारी जहाजांसाठी “पूर्णपणे खुली” आहे. लेबनॉनमध्ये १० दिवसांच्या युद्धविरामाला सुरुवात झाली असून, पहिल्याच दिवशी इस्रायली हल्ल्यांच्या अनेक आठवड्यांदरम्यान घरे सोडून पळून जाण्यास भाग पडलेले हजारो लोक आपल्या घरी परतले आहेत; या पार्श्वभूमीवर, इस्रायलला लेबनॉनवर बॉम्बहल्ला करण्यास “मनाई” करण्यात आली आहे, असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले.

.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment