होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

सूर्य अकोल्यावर कोपलेलाच; तापमान @ ४४

On: April 17, 2026 6:31 PM
Follow Us:
---Advertisement---

Heat Wave: संपूर्ण महाराष्ट्रात हवामान कोरडे होते, गेल्या २४ तासात राज्यात सर्वाधिक तापमान हे अकोला येथे ४४.२ अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे. त्या खालोखाल वर्धा येथे ४४.० इतके तापमान नोंदवले गेले आहे. तर जळगावला देखील पारा ४१.५. अंश सेल्सियस इतका कायम आहे. विदर्भात आणि मध्य महाराष्ट्रात काही तुरळक ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली. तर मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे.

उर्वरित राज्यात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास आहे. विदर्भात तापमानाचा पारा वाढल्याने उष्णतेच्या झळा सोसाव्या लागत आहे. गेल्या दोन तीन राज्यात उष्ण वातावरण आहे, उष्णतेने नागरिक हैराण झाले असून जीवाची लाहीलाही होत आहे. उष्णतेने काही ठिकाणी वादळी पावसाने दिलासा दिला तर पावसाने काही ठिकाणी शेतीचे नुकसान केले आहे. अद्याप एप्रिलचा पंधरवडा जात नाही, तोच उष्णतेचा कहर वातावरणात जाणवत आहे.

गेल्या २४ तासांत राज्यातील नोंदवलेले तापमान (अंश सेल्सिअस)
:
मुंबई (कुलाबा) ३३.६,
सांताक्रूझ ३३.१,
अलिबाग ३१.५,
रत्नागिरी ३२.५,
पणजी (गोवा) ३४.२,
डहाणू ३३.१,
पुणे ३९.७,
लोहगाव ४१.५,
जळगाव ४१.५,
कोल्हापूर ३८.१
महाबळेश्वर ३३.१,
मालेगाव ४३.४,
नाचशक ३७.५,
सांगली ३९.५,
सातारा ४१.२,
सोलापूर ४३.४,
धाराशीव ४१.२,
छत्रपती संभाजीनगर ४१.४,
परभणी ४२.०,
नांदेड -,
बीड ४०.८,
अकोला ४४.२,
अमरावती ४४.२,
बुलढाणा ४१.५,
ब्रह्मपुरी ४३.२,
चंद्रपूर ४३.४,
गोंदिया ४१.९,
नागपूर ४३.२,
वाशिम ४३.६,
वर्धा ४४.०,
यवतमाळ ४३.२.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

पाऊले चालती पंढरीची वाट… संत तुकोबांच्या वारीचं वेळापत्रक जाहीर; ‘या’ तारखेला पालखी करणार प्रस्थान

Jalgaon News: जळगाव विधान परिषद निवडणूक; अपक्ष उमेदवार महायुतीचे गणित बिघडवणार, 16 उमेदवार रिंगणात

गुटखा माफियांचे धाबे दणाणले, राज्यातील कारवाईत ‘इतक्या’ जणांच्या मुसक्या आवळल्या

पुणे- पिंपरी चिंचवड दारू भेसळप्रकरणी ‘इतक्या’ कर्मचाऱ्यांवर कारवाईची कुऱ्हाड

Monsoon Rain El NINO: राज्यात यंदा कमी पाऊस, जून महिन्यात उष्णतेच्या लाटा; हवामान तज्ज्ञांचा अंदाज

11th Admission: विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! अकरावी प्रवेशाची उद्या पहिली गुणवत्ता यादी जाहीर होणार; विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर येणार मेसेज

Leave a Comment