America- Israel on iran: होर्मूझ सामुद्रधुनीमध्ये व्यापारी जहाजांवर झालेल्या हल्ल्यांनंतर आणि अमेरिका व इराण यांच्यातील वाटाघाटी पुन्हा सुरू होण्याच्या शक्यतेने बाजारात एक संदेश गेल्याने तेलाच्या किमतीत ७ टक्क्याची किंचित वाढ झाली आहे. मात्र अमेरिका आणि इराण यांच्यातील चर्चेची फेरी पुन्हा सुरू होणार असल्याने होर्मूझची नाकेबंदी उठवली जाऊन तिढा सुटेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. (America- Israel on iran)
वॉशिंग्टन आणि तेहरान यांच्यातील शांटीवार्ता हे एकमेकांवर दाखविलेल्या अविश्वासामुळे लटकली होती. दोन्ही बाजूनी एकमेकांना देण्यात येणाऱ्या इशाऱ्यामुळे वाद आणखी चिघळत आहे. वाटाघाटीसाठी पुन्हा दोन्ही देश तयार झाल्याने, बाजारात एक संदेश गेला त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमती वाढल्या आहे, जागतिक किमतींसाठीचा प्रमुख मापदंड असलेल्या ब्रेंट क्रूड फ्युचर्समध्ये सोमवारी आशियामध्ये ७ टक्क्यांहून अधिक वाढ झाली. आज पहाटे किंमत प्रति बॅरल ९४.६९ डॉलर झाली, जी शुक्रवारी ९०.४० डॉलर पेक्षा किंचित जास्त आहे. असे वृत्त अल जंजिराने दिले आहे. (America- Israel on iran)
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी, इराणच्या बंदरांवरील अमेरिकेची नाकेबंदी चुकवण्याचा प्रयत्न करणाऱ्या इराणचा ध्वज असलेल्या एका मालवाहू जहाजाला अमेरिकी सैन्याने जप्त केल्याचे सांगितल्यानंतर ही नवीनतम दरवाढ झाली. ट्रम्प यांची ही घोषणा, आठवड्याच्या शेवटी युनायटेड किंगडम मेरिटाइम ट्रेड ऑपरेशन्स (UKMTO) सेंटरने दिलेल्या अहवालानंतर आली, ज्यात म्हटले होते की सामुद्रधुनीतून प्रवास करत असताना दोन जहाजांवर हल्ला झाला होता. UKMTO नुसार, इराणी गनबोट्सनी एका टँकरवर गोळीबार केला, तर एका कंटेनर जहाजावर “अज्ञात क्षेपणास्त्र” आदळले.असे, अल जंजिराने वृत्तात म्हटले आहे. (America- Israel on iran)
शुक्रवारी सामुद्रधुनी “पूर्णपणे खुली” असल्याचे घोषित केल्यानंतर, तेहरानने अमेरिकेने सुरू ठेवलेल्या नाकेबंदीचे कारण देत २४ तासांच्या आतच आपली भूमिका बदलली. इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये अमेरिकेने इराणी ध्वज असलेले मालवाहू जहाज जप्त करण्याच्या कृत्याचा “सशस्त्र चाचेगिरी” म्हणून निषेध केला आहे आणि प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत संभाव्य चर्चेसाठी आपले पथक इस्लामाबादला पाठवत असल्याची घोषणा केल्यानंतर काही तासांतच हा हल्ला झाला आहे. (America- Israel on iran)










