होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

जळगावकरांनो उष्माघातापासून स्वतःला जपा, पारा हळूहळू वाढतो आहे…

On: April 19, 2026 7:10 PM
Follow Us:
---Advertisement---

Jalgaon Heat wave: उन्हाचा कडाका वाढत असून उष्म्याने नागरिक हैराण झाले आहे, आता जळगावचा पारा ४२ अंश सेल्सियसवर गेला आहे, त्यामुळे हवामानात उष्मा जाणवत आहे. उंन्हाच्या झळा बसत आहे, त्याने जीवाची काहिली होत असून जसा जसा एप्रिल पुढे सरकत आहे तसा सूर्य आग ओकत आहे. पारा आणखी पुढे वाढण्याची शक्यता असल्याने उष्माघातपासून सावध राहण्याचे आवाहन आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून करण्यात आले आहे.

हवामानानुसार,जळगावमध्ये आकाश अंशतः ढगाळ आहे. जळगावमधील सध्याचे हवामान ४२ अंश सेल्सियस वर पोहचले आहे. तसेच आर्द्रता ११ टक्के तर वाऱ्याचा वेग २०.५ किमी-तास आणि निर्देशांक ०.६ इतका आहे. दृश्यमानता १० किमी इतकी नोंदवली गेली आहे.

हवेत उष्मा जाणवत असल्याने नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन आपत्ती व्यवस्थापन विभागाने केले आहे. उष्माघातापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी भर दुपारी फिरणे टाळावे तसेच डोके, तोंड आणि शरीर बऱ्यापैकी झाकून घ्यावे, जेणे करून उष्माघाताच्या कचाट्यात येणार नाही, याची काळजी घ्यावी, आपला आणी इतरांचा जीव वाचवणे गरजचे आहे. त्यामुळे वेळेचे आणि कामाचे रहिवाशांनी नियोजन अधिक चांगल्या प्रकारे करावे. मग ते कामासाठी असो, शाळेसाठी असो किंवा प्रवासासाठी; जळगावच्या हवामानाबाबत अद्ययावत राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

सध्याच्या हवामान अंदाजानुसार १९ एप्रिल रोजी पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसर, तसेच उत्तर खानदेश आणि दक्षिण मराठवाड्यातील काही भागांमध्ये दुपारनंतर वादळी पावसाची शक्यता आहे. त्यानंतर २० आणि २१ एप्रिल रोजी पावसाचे क्षेत्र वाढण्याचे संकेत आहेत. ज्यामुळे पश्चिम महाराष्ट्रासह (पुणे विभाग) मराठवाडा (प्रामुख्याने दक्षिण भाग आणि छत्रपती संभाजीनगर विभाग) आणि विदर्भात (प्रामुख्याने अमरावती विभाग) देखील काही प्रमाणात वादळी पाऊस पडेल. तथापि, २२ तारखेला वादळी पावसाचे क्षेत्र आणि त्याच्या तीव्रतेत घट होईल. संभाव्य हवामान बदल लक्षात घेऊन तातडीने योग्य ती प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment