होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

विदर्भ तापला, अकोला आणि वर्ध्यात तापमान @ ४५ अंश; आपल्या शहराचे तापमान जाणून घ्या!

On: April 20, 2026 7:09 PM
Follow Us:
---Advertisement---

Weather Update: राज्यातील गेल्या २४ तासांतील पर्जन्यमान असे आहे, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक दठकाणी पाऊस पडला. कोंकण गोवा व विदर्भात हवामान कोरडे होते. विदर्भात काही ठिकाणी तर कोकण -गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. मराठवाड्यात काही ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान अकोला व वर्धा येथे ४५ अंश सेल्सियस इतके तापमान नोंदवले गेले आहे. विदर्भात बहुतेक ठिकाणी तापमान हे ४३ ते ४५ अंश सेल्सियस इतके नोंदवले गेले आहे.

एप्रिल महिन्यात सूर्य कोपला असून विशेषतः विदर्भात पारा आताच काही ठिकाणी ४५ अंशावर गेल्याने आगामी काळाता तापमान आणखी नवा आकडा गाठेल असे दिसते त्यामुळे आगामी काळ ही नागरिकांची परीक्षा बघणारा आहे, त्यामुळे उन्हापासून काळजी घेण्याचे आवाहन आपत्ती व्यवस्थापन विभागाने सुरक्षितता बाळगण्याचे आव्हान केले आहे. दुपारी उन्हात फिरल्याने उष्माघाताचा त्रास होऊ शकतो त्यामुळे दुपारी १२ ते ४ दरम्यान नागरिकांनी आवश्यक असेल तरच बाहेर पडावे अन्यथा स्वतःची काळजी घ्यावी. तसेच उष्णतेपासून बचाव करण्यासाठी उपाययोजना कराव्यात,

गेल्या २४ तासांत राज्यातील प्रमुख शहरांमध्ये नोंदवले गेलेले तापमान (अंश सेल्सियस) खाली

मुंबई (कुलाबा) ३३.९,
सांताक्रूझ ३४.८,
अचलबाग -,
रत्नाचगरी ३२.८,
पणजी (गोवा) ३४.२,
डहाणू ३४.७,
पुणे ४०.७,
लोहगाव ४१.९,
अहिल्यानगर -,
जळगाव ४१.६,
कोल्हापूर ३७.२,
महाबळेश्वर ३२.८,
मालेगाव ४०.९
नाशिक ३९.४,
सांगली ४०.६,
सातारा ४०.९,
सोलापूर ४२.९,
धाराचशव ४०.०,
छत्रपती संभाजीनगर ४१.२,
परभणी ४१.३,
नांदेड -,
बीड -,
अकोला ४५.०,
अमरावती ४४.२,
बुलढाणा ४१.२,
ब्रह्मपुरी ४३.२,
चंद्रपूर ४२.४,
गोंदिया ४३.५,
नागपूर ४४.४,
वाशिम ४३.६,
वर्धा ४५.०,
यवतमाळ ४३.२.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment