Sabja Seeds: शरीराला थंडावा देणे, वजन कमी करणे, बद्धकोष्ठता दूर करणे, रक्तातील साखर नियंत्रित करणे आणि पचनक्रिया सुधारण्यासाठी सब्जा अत्यंत फायदेशीर आहे. यामध्ये फायबर, प्रथिने आणि ओमेगा-३ फॅटी ॲसिड असते. तसेच त्याच्या जास्त सेवनाने पोटदुखी, जुलाब किंवा ॲलर्जी होऊ शकते त्यामुळे सब्जाचे सेवन कसे करावे याची माहिती असणे महत्त्वाचे आहे. तुळशीच्या बियांना हिंदीमध्ये सब्जा बिया किंवा तुकमारिया असेही संबोधले जाते. सब्जा हा प्रचलित शब्द आहे, आपण लिंबू शरबत विक्रेत्याकडे गेल्यावर त्याला सब्जा टाकण्यास आवर्जून सांगतो. या तुळशीच्या झाडाच्या बिया असून त्या काळ्या तिळाच्या बियांसारख्या दिसतात. पाण्यात टाकल्यावर त्या फुगतात आणि बीया तरंगतात त्यामध्ये फायबर, प्रथिने ओमेगा-३ फॅटी ऍसिड, लोह आणि मॅग्नेशियम यांसारखी पोषक तत्वे असतात. त्याच्या सेवनाचे फायदे आणि तोटे आता जाणून घेऊ.
सब्जा सेवनाचे मुख्य फायदे
*शरीराला थंड ठेवण्यासाठी मदत होते, उन्हाळ्यात शरीराचे तापमान कमी करते, उष्माघातापासून संरक्षण करते. उन्हाळ्यात सब्जाला चांगली मागणी असते.
*सब्जाच्या सेवनाने पचनक्रिया सुधारते, तसेच त्यात भरपूर फायबर असल्यामुळे बद्धकोष्ठता, गॅस आणि आम्लपित्तापासून आराम मिळतो. बिया १५-२० मिनिटे पाण्यात भिजवून नंतर ते पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुधारते, पोटाचे डायजेशन चांगले राहते.
*याचा आणखी एक फायदा म्हणजे रोगप्रतिकारशक्ती वाढवते, अँटिऑक्सिडंट्स आणि फ्लेव्होनॉइड्स रोगप्रतिकारशक्ती चांगली ठेवण्यास मदत होते. सर्दी आणि तापासाठी तुम्ही याचा काढा पिऊ शकता.
*वजन कमी करण्यास मदत करत असते, कमी कॅलरीज आणि जास्त फायबरमुळे भूक कमी होते, ज्यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.
*रक्तातील साखरेचे नियंत्रण ठेवते, चयापचय क्रिया मंदावते आणि ग्लुकोजमध्ये प्रमाण कमी करते. टाईप २ मधुमेहासाठी उपयुक्त मानले जाते.
*हार्मोन्सचे संतुलन राखते, ओमेगा-३ आणि फायटोइस्ट्रोजेन्स हार्मोन्स संतुलित ठेवण्यास मदत करतात. पीसीओएस-रजोनिवृत्तीसाठी फायदेशीर.
सब्जा सेवनाचे तोटे
*मधुमेह ज्यांना आहे, आणि जे आधीच औषधे घेत आहेत, त्यांनी काळजी पूर्वक सेवन करावे, कारण की सब्जा साखर कमी करू शकतो.
*खूप जास्त प्रमाणात रोज सेवन केल्यास, काही जणांना सर्दी-खोकल्याचा त्रास होऊ शकतो.
*पचनाची समस्या फायबरचे प्रमाण जास्त असल्याने, जास्त खाल्ल्यास पोट फुगणे, गॅस, पोटदुखी किंवा जुलाब होऊ शकतात. त्यामुळे सेवन करतांना काळजी घ्यावी.
*कोरडे सब्जा बियाणे खाणे अत्यंत धोकादायक आहे; यामुळे घशात अडकून गुदमरल्यासारखे होऊ शकते, त्यामुळे सब्जा नेहमी भिजवलेला खावा, साधारण एक चमचा सब्जाच्या बिया १ ग्लास पाणी किंवा दुधात १५-२० मिनिटे भिजवून ठेवा आणि त्यांनतर सेवन करा. बिया फुगल्यावर त्या सरबत, फालुदा, स्मूदी किंवा दहित घाला.
*काही लोकांना सब्जा बियांमुळे त्वचेवर पुरळ उठणे किंवा ऍलर्जी होऊ शकते
*जास्त प्रमाणात सब्जा खाल्ल्याने इस्ट्रोजेनची पातळी कमी होऊ शकते, त्यामुळे गरोदर महिलांनी टाळणे चांगले
(Disclaimer- गर्भवती महिलांनी डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच याचे सेवन करावे, अतिसेवनामुळे पोटात जडपणा येऊ शकतो, त्यामुळे योग्य प्रमाणात सेवन करा. ज्यांना काही व्याधी असतील त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच याचे सेवन करावे)






