World Maleriya Day: आफ्रिकेमध्ये मलेरिया उच्चाटन करण्यासाठी आरोग्य आणि स्वयंसेवी क्षेत्रांतील अनेक संघटना सहभागी झाल्या. आफ्रिकन खंडात सुरू असलेल्या प्रयत्नांमधून जागतिक मलेरिया दिनाचा उदय झाला. जागतिक आरोग्य दिन (WMD) हा जागतिक आरोग्य संघटनेद्वारे (WHO) सध्या साजरा केला जातो, तो ११ अधिकृत जागतिक सार्वजनिक आरोग्य मोहिमांपैकी एक आहे. या मोहिमांमध्ये जागतिक आरोग्य दिन, जागतिक रक्तदाता दिन, जागतिक लसीकरण सप्ताह, जागतिक प्रतिजैविक जागरूकता सप्ताह, जागतिक रुग्ण सुरक्षा दिन, जागतिक क्षयरोग दिन, जागतिक तंबाखू विरोधी दिन, जागतिक हिपॅटायटीस दिन आणि जागतिक एड्स दिन यांचा समावेश आहे. तसेच जागतिक मलेरिया दिवस ही पळाला जातो.
सर्वात अलीकडील जागतिक मलेरिया अहवालानुसार, २०१५ मध्ये मलेरियामुळे ४,२९,००० मृत्यू आणि २१. २ कोटी नवीन रुग्णांची नोंद झाली. २०१० ते २०१५ दरम्यान जागतिक स्तरावर नवीन मलेरिया रुग्णांचे प्रमाण २१ टक्क्यांनी कमी झाले आणि त्याच काळात मलेरियामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण २९ टक्क्यांनी घटले. उप-सहारा आफ्रिकेत, रुग्णसंख्या आणि मृत्यू दरात अनुक्रमे २१ टक्के आणि ३१ टक्क्यांनी घट झाली.
विज्ञान झपाट्याने प्रगती करत आहे. पहिल्यांदाच, आपल्याला खऱ्या अर्थाने मलेरियाचे निर्मूलन करणे ही एक खरी शक्यता वाटत आहे. नवीन लसी, उपचार, मलेरिया नियंत्रणाची साधने आणि डासांचे जनुकीय बदल व दीर्घकाळ टिकणाऱ्या इंजेक्शन्स यांसारखी अग्रगण्य तंत्रज्ञानं विकसित होत आहेत. सध्या, २५ देश दरवर्षी १ कोटी मुलांच्या संरक्षणासाठी मलेरियाची लस पुरवली जात आहे. वितरित केल्या जाणाऱ्या सर्व नवीन मच्छरदाण्यांपैकी ८४% मच्छरदाण्या या पुढच्या पिढीच्या आहेत. राष्ट्रीय स्तरावर राबवलेले कार्यक्रम परिणामकारक ठरत आहेत. क्षमता यापूर्वी कधीही इतकी मोठी नव्हती, आता वाढली आहे.
जागतिक मलेरिया दिन २०२६ रोजी, जागतिक आरोग्य संघटनेने आपल्या भागीदारांसोबत ‘मलेरिया निर्मूलनासाठी वचनबद्धता’ दर्शविली आहे. ‘आता आपण करू शकतो. आता आपण ते केलेच पाहिजे.’ अशी हाक देत ही मोहीम सुरू केली. लोकांचे जीव वाचवण्यासाठी आणि मलेरियामुक्त भविष्यासाठी निधी उभारण्यासाठी प्रयत्न करणे हे एक कृती आवाहन आहे. त्यासाठी सर्वांच्या सहकार्याने या आजाराचे समूळ उच्चाटन करणे शक्य आहे.
दरवर्षी, जागतिक आरोग्य संघटनेचा (WHO) जागतिक मलेरिया अहवाल जाहीर करते, जगभरातील मलेरिया नियंत्रण आणि निर्मूलनाच्या प्रवृत्तींचे सर्वसमावेशक आणि अद्ययावत मूल्यांकन सादर करते. २०२६ ची आवृत्ती मलेरिया कार्यक्रम आणि संशोधनातील गुंतवणुकीचा आढावा घेते आणि ८० मलेरिया-ग्रस्त देशांमधील प्रतिबंध, निदान, उपचार, निर्मूलन आणि निगराणी या सर्व प्रमुख हस्तक्षेप क्षेत्रांमधील प्रगतीचे मूल्यांकन करते.
या वर्षीचा अहवाल मलेरियाविरोधी औषध-प्रतिकारशक्तीच्या वाढत्या धोक्यावर प्रकाश टाकतो. क्लोरोक्विन आणि सल्फॅडॉक्झिन-पायरीमेथामाइनच्या अपयशानंतर मलेरिया उपचारांचा कणा असलेल्या आर्टेमिसिनिन डेरिव्हेटिव्हजला आंशिक प्रतिकार झाल्याचे आता आफ्रिकेतील किमान ८ देशांमध्ये निश्चित झाले आहे किंवा तसा संशय आहे, आणि आर्टेमिसिनिनसोबत एकत्रितपणे वापरल्या जाणाऱ्या काही औषधांची परिणामकारकता कमी होण्याची संभाव्य चिन्हे दिसत आहेत. असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. त्यामुले सर्वत्र स्वच्छता आणि डासांची उत्पत्ती वाढणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे. गटार आणि घाण पाण्याची डबकी उघडी राहणार नाही, याची काळजी हिरे घ्यावी लागणार आहे. सर्वंकष प्रयत्नातूनच मलेरियाचा हद्दपार करता येणार आहे.








