होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

शेतकऱ्यांना दिलासा, देवळाली-दानापूर ‘किसान रेल’ला प्रशासनातर्फे मुदतवाढ!

On: April 25, 2026 1:44 PM
Follow Us:
---Advertisement---

Nashik News: नाशिक येथील देवळालीपासूून सुटणारी ही कृषीरेल्वे दानापूर (बिहार) पर्यंत धावते. देवळाली ते दानापूर ही ‘किसान रेल’ आहे, शेतकऱ्यांचे नाशवंत कृषी उत्पादने, जसे की फळे आणि भाजीपाला, दूध आणि मासे, परराज्यातील बाजारपेठांमध्ये कमी खर्चात पाठविण्यासाठी कृषी रेल्वेसेवेमुळे मदत होते. शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनांसाठी नवीन बाजारपेठ उपलब्ध करून देणे या रेल्वेसेवेमागील हा मुख्य उद्देश आहे.आता मध्य रेल्वे प्रशासनाने शेतकरी आणि प्रवाशांच्या सुविधेसाठी आणि मागणीनुसार देवळाली ते दानापूर ‘शेतकरी समृद्धी अनारक्षित विशेष रेल्वे’ गाडीचा कालावधी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

तपशील पुढीलप्रमाणे

गाडी क्रमांक ०१०५३ देवळाली ते दानापूर ‘शेतकरी समृद्धी अनारक्षित विशेष रेल्वे २५ एप्रिल आणि २ मेपर्यंत विस्तार करण्यात आला आहे. गाडी क्रमांक ०१०५४ दानापूर ते मनमाड ‘शेतकरी समृद्धी अनारक्षित विशेष रेल्वे २७ एप्रिल आणि ४ मेपर्यंत विस्तार करण्यात आला आहे. विशेष गाड्यांच्या वेळापत्रकात, थांब्यांमध्ये व रचनेमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

या रेल्वे मधून डाळिंब, केळी, द्राक्षे, कांदा, टोमॅटो आणि इतर कृषी उत्पादनांचा समावेश आहे. मालवाहू डब्यांची क्षमता २३ टन माल वाहून नेण्याची आहे. .या विशेष रेल्वे गाडीत १० मालवाहू डबे आणि १० सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे आहेत. नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही रेल्वेसेवा अधिक उपयुक्त आहे. शेतकऱ्यांसाठी अशा रेल्वेसेवेची असलेली गरज देवळाली ते दानापूर कृषी रेल्वेमुळे पूर्ण झाली आहे.

 

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment