होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

धक्कादायक बातमी: नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांचे जात प्रमाणपत्र अवैध; नगराध्यक्ष पदावर टांगती तलवार?

On: April 25, 2026 4:25 PM
Follow Us:
---Advertisement---

Jalgaon News: भुसावळ मधून एक मोठी बातमी समोर आली आहे, भुसावळच्या नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांचे जात प्रमाणपत्र जात पडताळणी समितीने अवैध ठरवले आहे, या निर्णयामुळे त्यांचे नगराध्यक्षपद धोक्यात येण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होता आहे.

दरम्यान याबाबत मिळालेली माहिती अशी की, भुसावळ नगरपालिकेतील नगराध्यक्ष पद हे अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलेसाठी राखीव होते. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर लढत देऊन गायत्री भंगाळे यांनी राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे यांचा पराभव करून विजय संपादन केला.

निवडणूक काळात दिलेल्या शपथपत्रात गायत्री भंगाळे यांनी अनुसूचित जाती (SC) प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र दाखल केले होते. हे प्रमाणपत्र भुसावळचे प्रांताधिकारी यांनी जारी केले होते. मात्र या प्रमाणपत्रावर आक्षेप घेत तक्रारी दाखल झाल्यानंतर प्रकरण जात पडताळणी समितीकडे वर्ग झाले. नियमांनुसार निवडून आल्यानंतर सहा महिन्यांच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असते. मात्र त्याआधीच समितीने सादर केलेले प्रमाणपत्र अवैध असल्याचा निर्णय दिला. या प्रकरणी प्रमोद सावकारे, रजनी सावकारे, संजय तायडे व राहुल तायडे यांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई झाली.

जळगाव जात पडताळणी समितीचे अध्यक्ष बोदरडे, सदस्य एस. एस. महाजन व एन. एस. रावते यांच्या समितीने हा निर्णय दिल्याने जळगाव जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणामुळे भुसावळ नगरपालिकेच्या सत्तासमीकरणावरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.दुसरीकडे नगराध्यक्ष पद देखील धोक्यात आहे.

 

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment