Letest Weather Update: देशासह राज्यात यंदा मान्सूनचे प्रमाण कसे असेल याचा पहिला हवामान अंदाज समोर आला आहे. या अंदाजामुळे शेतकऱ्यासह शासनाची ही चिंता वाढली आहे. खास करून आपला देश हा कृषीप्रधान देश आहे. भारतातील शेती ही प्रमुख्यानं पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे, पुरेसा पाऊस झाला तरच शेतकऱ्यांना पिके घेता येतील अन्यथा पाण्याअभावी शेतकऱ्यांची पिके हातची जातील. या हवामान अंदाजाने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे, चांगला पाऊस झाला तरच पिण्याच्या पाण्याची सोय होईल अन्यथा दुष्काळाचा सामना करावा लागेल, त्यामुळे शासनाची चिंता वाढली आहे. आधीच शेतकऱ्यांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे.
हवामानाचा लहरीपणामुळे कुठे अतिवृष्टी तर कुठे पाण्याअभावी पिके करपत आहेत, तर कधी-कधी पाऊसच पडत नाही, त्यामुळे शेतकरी दुष्काळाच्या दुष्टचक्रामध्ये सापडतो. पावसाच्या लहरीपणामुळे सध्या देशातील शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. यापूर्वी अनेक राज्यांना अतिवृष्टीचा तडाखा बसला आहे. त्याचा फटका ही बसला आहे. दरम्यान यंदा देशात पावसाचं प्रमाण कसं असणार असून तसा पहिला अंदाज समोर आला आहे, त्यामुळे सर्वांच्याच चिंतेत भर पडली आहे.
जागतिक हवामान संघटना (WMO) ने वर्तवलेल्या अंदाजानुसार यावर्षी भारतामध्ये मान्सूनवर अल नीनोचा प्रभाव राहण्याची शक्यता ववर्तवण्यात आली आहे. या अंदाजनुसार देशात पावसाचं प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे. देशासह महाराष्ट्रात देखील यावेळी अल नीनोचा प्रभाव पहायला मिळू शकतो, त्यामुळे महाराष्ट्रातही पावसाचं प्रमाण कमी राहण्याचा अंदाज आहे. त्याचा फटका थेट शेतीला बसण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. तसेच यंदा उन्हाचे प्रमाण अधिक वाढू शकते असा इशाराही जागतिक हवामान संघटनेने दिला आहे. मात्र काही हवामान तज्ज्ञांच्या मते सध्या तरी अल नीनोच्या प्रभाबाबत आताच कोणताही अंदाज काढणे हे घाईचं ठरू शकतं.










