होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

Letest Weather News: सूर्य कोपलेलाच! अकोल्याचा पारा पून्हा ४५ अंशावर तर जळगाव ४३.३

On: April 25, 2026 7:37 PM
Follow Us:
---Advertisement---

Letest Weather News: सूर्य आग ओकत आहे, राज्यात काही ठिकाणी तापमान ४४ ते ४५ पर्यत गेले आहे, वातावरणात प्रचंड उकाडा जाणवत आहे, उन्हाची तीव्रता कायम असल्याने जीवाची काहिली होत आहे. सकाळपासूनच उष्ण हवामान जाणवत आहे. गेल्या २४ तासांतील पर्जन्यमानावर एका नजर टाकली असता, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला असून कोंकण, गोवा, विदर्भ व मराठवाड्यात हवामान कोरडे होते. याठिकाणी हवामान विभागाने येलो अलर्ट दिला आहे. राज्यात सर्वाधिक तापमान अकोला येथे ४५ अंश सेल्सियस नोंदवले गेले आहे तर सर्वात कमी तापमान हे महाबळेश्वर येथे ३२.६ अंश सेल्सियस इतके तापमान आहे.

जळगाव तापले पारा ४३.३ अंश

जळगाव मध्ये पारा हळूहळू वाढत असून आज जळगावचे तापमान ४३.३ अंशावर गेले आहे. त्यामुळे जळगावकर उष्णतेने हैराण झाली आहे. दरम्यान कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे, विदर्भात काही ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ दिसून येत आहे. महाराष्ट्र व मराठवाड्यात काही ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली. दरम्यान विदर्भात तापमान ४३ ते ४५ दरम्यान सातत्याने आढळून येत आहे. अकोल्यानंतर अमरावती ४४.८,वर्धा ४४.४, चंद्रपूर ४४, नागपूर ४३.४ तर ४३.२ इतके प्रचंड उष्णता जाणवत आहे.

 

गेल्या २४ तासांत राज्यातील प्रमुख शहरांमध्ये नोंदवले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सियसमध्ये) :

मुंबई (कुलाबा) ३३.०,
सांताक्रूझ ३५.६,
अनलबाग ३३.७,
रत्नागिरी ३६.३,
पणजी (गोवा) ३५.०,
डहाणू ३५.६,
पुणे ३९.९,
लोहगाव ४१.१,
अहिल्यानगर -,
जळगाव ४३.३,
कोल्हापूर ३७.२,
महाबळेश्वर ३२.६,
मालेगाव ४२.६,
नाशिक ३९.६,
सांगली ३९.८,
सातारा ३८.९,
सोलापूर ४१.४,
धाराशिव ४०.४,
छत्रपती संभाजीनगर ४१.४,
परभणी ४२.०,
नांदेड -,
बीड ४१.५,
अकोला ४५.०,
अमरावती ४४.८,
बुलढाणा ४१.५,
ब्रह्मपुरी ४३.७,
चंद्रपूर ४४.०,
गोंदिया ४३.२,
नागपूर ४३.४,
वाशीम ४२.६,
वर्धा ४४.४,
यवतमाळ ४४.०.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment