होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

अकोल्यावर सूर्य कोपलेला; जळगावचे तापमान किती ‘ते’ बघा..

On: May 15, 2026 7:37 PM
Follow Us:
---Advertisement---

Letest Weather News: सलग गेल्या काही दिवसांपासून अकोल्याचे तापमान ४५ अंश सेल्सियसवर जात आहे. अकोल्यात सलग दोन दिवस तापमान ४५.९ इतका पारा कायम आहे. त्यामुळे अकोल्यात सूर्य आग ओकत आहे. जळगावचे तापमान किंचित उतरले आहे, आज जळगावचे तापमान ४५.३ अंश सेल्सियस इतके नोंदवले गेले आहे. गुरुवारी तापमान ४५.६ अंश सेल्सियस इतके होते. तरी ही उन्हाचे चटके आणि वातावरणात उकाडा कायम होता. सायंकाळी गरम झळा लागत होत्या. कोकण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात हवामान विभागाने येलो अलर्ट दिला आहे.

गोव्यासह संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला आहे. मध्य महाराष्ट्र व विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ तर मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी व कोंकण गोव्यात काही ठिकाणी तापमानात वाढ झाल्याचे दिसते. कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. कोकणात १५ ते १७ येलो अलर्ट दिला आहे, तसेच मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात १५ ते १८, तसेच विदर्भात १५ ते २१ दरम्यान येलो अलर्ट दिला आहे.

गेल्या २४ तासांत राज्यातील प्रमुख शहरांमध्ये नोंदवले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सियसमध्ये)

मुंबई (कुलाबा) ३४.०,
सांताक्रूझ ३४.१,
अलिबाग ३४.५,
रत्नागिरी ३३.०,
पणजी (गोवा) ३६.२,
डहाणू ३६.२,
पुणे ३८.६,
लोहगाव ४१.३,
अहिल्यानगर ३९.२,
जळगाव ४५.३,
कोल्हापूर ३४.७,
महाबळेश्वर ३०.९,
मालेगाव ४२.०,
नाशिक ३८.८,
सांगली ३६.९,
सातारा ३७.३,
सोलापूर ४२.४,
धाराशिव ४१.६,
छत्रपती संभाजीनगर ४१.६,
परभणी ४३.९,
अकोला ४५.९,
अमरावती ४५.२,
बुलढाणा ४१.५,
ब्रह्मपुरी ४३.४,
चंद्रपूर ४२.८,
गोंदिया ४१.२,
नागपूर ४४.०,
वाशिम ४३.४,
वर्धा ४५.५ ,
यवतमाळ ४३.६

सोर्स: पुणे वेधशाळा

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment