होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

राज्यासह जळगावचे तापमान किती ते जाणून घ्या!

On: May 18, 2026 7:53 PM
Follow Us:
---Advertisement---

Latest Weather News: राज्यात पुन्हा एकदा सर्वात जास्त कमाल तापमान अकोला येथे ४६.० अंश सेल्सियस नोंदविण्यात आले आहे, तसेच वर्धा येथे ही तापमानाने ४६ अंश गाठला आहे. त्याखालोखाल अमरावती ४५.८ तर परभणी ४५.२ अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले आहे. जळगावचे तापमान ही ४४ अंशाच्या उंबरठ्यावर पोहचले आहे. त्यामुळे जळगाव देखील तापले असून उन्हाच्या झळांनी नागरिक बेजार झाले आहे. वातावरणात असह्य उकाडा जाणवत असल्याने जीवाची काहिली झाली आहे. वाढत्या तापमानाने हैराण झालेल्या नागरिकांनी काळजी घ्यावी,

दुसरीकडे सर्वात कमी तापमान हे महाबळेश्वर येथे ३२.३ अंश सेल्सियस नोंदवण्यात आले आहे. कोकण- गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला आहे तर मराठवाडा व विदर्भात हवामान कोरडे होते. संपूर्ण राज्यात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते.

गेल्या २४ तासांत राज्यातील प्रमुख शहरांमध्ये नोंदवले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सियसमध्ये)

मुंबई (कुलाबा) ३४.२,
सांताक्रूझ ३४.३,
रत्नागिरी ३३.९,
पणजी (गोवा) ३५.२,
डहाणू ३५.३,
पुणे ३९.२,
लोहगाव ३९.६,
अहिल्यानगर ४१.१,
जळगाव ४३.९,
कोल्हापूर ३८.५,
महाबळेश्वर ३२.३,
मालेगाव ४२.२,
नाशिक ३९.०,
सांगली ४२.०,
सातारा ४०.२,
सोलापूर ४४.०,
धारालशव ४१.९,
छत्रपती संभाजीनगर ४२.४,
परभणी ४५.२,
अकोला ४६.०,
अमरावती ४५.८,
बुलढाणा ४२.२,
ब्रह्मपुरी ४४.६,
चंद्रपूर ४४.०,
गोंदिया ४१.२,
नागपूर ४४.४,
वाशीम ४३.०,
वर्धा ४६.०,
यवतमाळ ४४.४.

 

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment