होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

राष्ट्रवादीत (एसपी) नेते मोठे झाले आणि पक्षाला सोडून गेले: प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची खंत

On: May 5, 2026 6:48 PM
Follow Us:
---Advertisement---

Jalgaon News: राष्ट्रवादी काँग्रेसच पक्षाची (शरद पवार) आढावा बैठक झाली, त्यात निवडणूक काळात उमेदवारांना आवश्यक रसद पुरविण्यात पक्ष कमी पवारांनी अनेक नेते मोठे केले; रसदीच्या बळावर वाढलेले काही जण सत्ता बदलताच दुसऱ्या पक्षात गेल्याची खंत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी येथे आज येथे व्यक्त केली. त्यामुळेच पुढील काळात तरुणांना संधी देण्याचे सूतोवाच शिंदे यांनी केले.

जळगाव जिल्हयात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाला आलेली मरगळ झटकून कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्याच्या उद्देशाने आढावा बैठक घेण्यात आली. जिल्ह्यातला आढावा घेण्यासोबत पक्षात नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीसाठी जळगावमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटातर्फे आज बैठक देखील घेण्यात आली. यावेळी प्रदेशाध्यक्ष शिंदें यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संघटन मजबूत करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. शंदे म्हणाले की, राज्यात २०२९ मध्ये शरद पवार गटाशिवाय सत्ता स्थापन होणार नाही निम्मी आमदार हे शरद पवार गटाचे असतील असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच जळगाव हा शरद पवारांना सर्वात जास्त मानणारा जिल्हा आहे. या ठिकाणी त्यांनी अनेक लोकप्रतिनिधी घडविले. आमदार, खासदार बनविले पण अनेक लोक पक्षाच्या जीवावर मोठे झाले व संघर्षाच्या काळात पवार साहेबांना सोडून गेले. पक्ष अडचणीत असतांना ही सामान्य कार्यकत्यांनी पवारांशी एकनिष्ठ कायम ठेवली.

भाजप सरकार विरुद्ध जनतेत मोठा असंतोष आहे. महायुती किंवा महाविकास आघाडीत फार काही व्यवस्थित चालले नाही, प्रत्येक जण पद घेताना आपल्या सोयीनुसार भूमिका घेत आहे. त्यामुळे वरिष्ठ पातळीवर घेतल्या जाणाऱ्या निर्णयांची खाली अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे निवडणुकांमध्ये यश मिळत नाही. या पुढील काळात जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका आहेत. ज्या जागा पक्ष लढवणार आहे, त्यांचा अभ्यास आताच करुन ठेवा. सर्वच्या सर्व जागा लढविण्याच्या भानघडीत पडू नका. कार्यकर्ता निवडणूक लढविण्यासाठी उत्साही असतो. मात्र, त्यामुळे सर्व शक्ती विभागली जाते. आतापासूनच कामाला लागण्याच्या सूचना पदाधिकारी, कार्यकर्त्यांना केल्या. पुढील काळात राष्ट्रवादीत तरुणांना संधी देण्याचे संकेत दिले.

 

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment