होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

धक्कादायक!..जेव्हा जन्मदाताचं बनतो वैरी, पित्याने मुलीचे तुकडे करत केली हत्या! पोलिसांनी कसा लावला छडा ‘ते’ जाणून घ्या!

On: May 21, 2026 3:10 PM
Follow Us:
---Advertisement---

Uttar Pradesh: जन्मदात्या पित्याने मुलीचे तुकडे केले, तिचा मृतदेह पेट्या आणि पिशव्यांमध्ये भरून ट्रेनमध्ये पाच तुकडे टाकले आणि तिचे शीर दुसरीकडे फेकून दिले; पित्याने एवढे टोकाचे पाऊल उचलले? त्यांचा का संतप्त अनावर का झाला, असे अनेक तर्कविर्तक लढविले जात आहे. या घटनेने काही प्रश्न उपस्थित झाले. लखनऊ रेल्वे स्थानकावर छपरा-गोमतीनगर एक्सप्रेसच्या एका डब्यात एक पेटीत सापडलेल्या शरीराच्या अवयवांच्या प्रकरणात एक मोठा खुलासा झाला आहे. ज्या किशोरवयीन मुलीच्या शरीराचे अवयव सापडले होते, ती कुशीनगरमधील सेवारही येथील रहिवासी असल्याचे तपासात पुढे आले आहे. वडिलांनी स्वतःच तिचे तुकडे केले, त्यांनतर तिचे शीर एका तलावात फेकून दिले आणि उरलेले अवयव ट्रेनमध्ये सोडून दिल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली आहे. पित्यासह दोघा नातलगा विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

किशोरवयीन मुलीची हत्या आणि त्यानंतर तिच्या शरीराचे तुकडे करून ते छपरा-गोमतीनगर एक्सप्रेसमध्ये ठेवल्याच्या प्रकरणात जीआरपीएफला मोठे यश मिळाले आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये संबंधित संशयिताची ओळख पटवून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. तपासात उघड झाले आहे की, वडिलांनी आपल्या मुलीची हत्या करून तिच्या शरीराचे सहा तुकडे केले. ती एका तरुणाशी फोनवर बोलायची. मुलीने वडिलांचा सल्ला ऐकण्यास नकार दिला, ज्यामुळे संतप्त झालेल्या वडिलांनी हे कृत्य केल्याचा गुन्हा कबूल केला. पोलिसांनी कुशीनगरमधील सेवारही येथील रहिवासी बिग्गन अन्सारी याला ताब्यात घेतले आहे.

घटना नेमकी काय आहे

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कुशीनगरमधील सेवारही येथील रहिवाशी बिग्गन अन्सारीला १६ वर्षांची शब्बा नावाची मुलगी आहे. शब्बा दुसऱ्या समाजातील एका तरुणाशी फोनवर बोलायची.वडिलांना आपल्या मुलीचा तिरस्कार वाटू लागला होता, आपल्या मुलीला ज्या तरुणापासून दूर राहण्यास सांगितले होते.ती वारंवार ताकीद देऊनही, शब्बा त्याच्या संपर्कात होती, याचा बिग्गनला खूप राग आला, त्याला आपल्या मुलीचा तिरस्कार वाटू लागला. आपला अपमान होत आहे, असे त्याला वाटले. सूत्रांनुसार, आरोपीच्या दोन्ही मुलींनी प्रेमविवाह केले होते. शब्बाही तोच मार्ग अवलंबेल अशी भीती त्याला वाटत होती.

दरम्यान एक कटाचा भाग म्हणून, आरोपीने पाच दिवसांपूर्वी आपल्या पत्नी आणि दोन मुलांना आपल्या एका नातेवाईकाच्या घरी पाठवले होते. शब्बा आणि त्याची वृद्ध आई घरीच राहिले. १६ मे रोजी, बिग्गनने खिरकिया, पदरौना येथील रहिवासी असलेली आपली बहीण नूरजहाँ आणि मेहुणा मजबुल्ला यांना बोलावून शब्बाच्या हत्येच्या कटात त्यांना सामील करून घेतले. संध्याकाळी उशिरा, त्याने शब्बाची घरी हत्या केली आणि आपली बहीण व मेहुण्याच्या मदतीने धारदार शस्त्राने शरीराचे तुकडे केले. त्याने तिचे शीर गावातील तलावात फेकून दिले. त्याने शरीराचा उर्वरित भाग जुन्या कपड्यांमध्ये आणि प्लास्टिकमध्ये गुंडाळून एका पेटीत ठेवला. त्यानंतर ते तिघे रिक्षाने तमकुही रोड स्थानकावर पोहोचले. तिथे, त्यांनी छपरा-गोमतीनगर एक्सप्रेसच्या स्लीपर कोच एस-१ मध्ये ती पेटी ठेवली. मृतदेह ठेवल्यानंतर, ते तिघे शेजारच्या एसी कोचमधून बाहेर पडले, जे कॅमेऱ्यात कैद झाले. त्यामुळे या प्रकरणाचे बिंग फुटले, या फुटेजमुळे आरपीएफला आरोपींचा माग काढण्यास मदत झाली.

पोलिसांनी अशी आणली उघडकीस घटना

मृताची ओळख पटू नये म्हणून तरुणीचे धड एका पेटीत सापडले, तिचे हात आणि पाय एका पिशवीत पॅक केलेले आढळले ओळख लपवण्यासाठी धडापासून शीर वेगळे केले. आरोपींनी एका कटाचा भाग म्हणून शब्बाची हत्या केली आणि तिची ओळख लपवण्यासाठी तिचे शीर कापले तसेच आरोपींनी शीराची विल्हेवाट लावली. त्यानंतर हात, पाय आणि धड पेट्या आणि पॉलिथिनच्या पिशव्यांमध्ये पॅक करण्यात आले. शीर तलावात फेकल्याचे तपासात समोर आले. पोलिसांना सीसीटीव्ही फुटेजमध्ये संशयिताचे फुटेज सापडले. त्यानंतर त्यांनी ते फुटेज परिसरातील रहिवाशांना दाखवले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपीची ओळख पटवून त्याला अटक करण्यात आली. गुरुवारी या प्रकरणाचा संपूर्ण छडा पोलिसांनी लावला.

 

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment