Amalner News: शिवसेना मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या आदेशानुसार तसेच शिवसेना संसदीय गटनेते श्रीकांत शिंदे यांच्या सूचनेनुसार अमळनेर येथे उद्या शिवसेनेच्या वतीने SIR आढावा बैठक व सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील व जळगाव लोकसभा संपर्कप्रमुख दिलीप लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, माजी आमदार शिरीष दादा चौधरी यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रमाची तयारी करण्यात आली आहे.
या कार्यक्रमास आमदार अमोल पाटील यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. तसेच जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील, विष्णु भंगाळे, उत्तर महाराष्ट्र महिला आघाडी प्रमुख सरिता माळी, ॲड. ललिता पाटील, नगराध्यक्ष डॉ. परिक्षीत बाविस्कर आणि जिल्हाप्रमुख रोहित कोगटा यांच्यासह शिवसेनेचे विविध पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

रविवारी दि. २४ मे २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता इंदिरा गांधी भवन, अमळनेर येथे हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. तालुक्यातील शिवसेना, युवासेना व महिला आघाडीचे पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक, सरपंच, सदस्य, कार्यकर्ते आणि शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन तालुकाप्रमुख गुलाब पाटील यांनी केले आहे.











