Jalgaon News: गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे होते. कोकण- गोव्यात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. उर्वरित राज्यात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते. राज्यात सार्वधिक कमाल तापमान ब्रह्मपुरी येथे ४४.२ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले आहे. सर्वात कमी तापमान महाबळेश्वर येथील ३०.९ अंश सेल्सियस इतके नोंदवले गेले आहे. त्यामुळे पर्यटकांसाठी तरी महाबळेश्वर सध्या राईट चॉईस ठरले आहे. येथील पारा ३० ते ३५ अंश सेल्सियस पर्यंत झुलत आहे. जळगावमध्ये दिवसभर वातावरणात उकाडा जाणवत आहे. तापमान ४०.९ इतके नोंदवले गेले आहे. येथे ही तापमान किंचित घसरले आहे.

कोकणात हवामान कोरडे राहण्याची शक्यता असून कोकणात दि. ६ ते १० मे पर्यंत एलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान उष्ण व दमट राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. दि. ७ मे- तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून उष्ण व दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. दि. ८ मे- तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. उष्ण व दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. दि.- ९ मे हवामान कोरडे राहण्याची शक्यता असून उष्ण व दमट हवामान राहण्याची शक्यता असून हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे दि.-१० मे हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातही हवामान कोरडे आणि काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मराठवाड्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. तसेच विदर्भात काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी मेगगर्जनेसह विजांचा कडकडाट व सोसाट्याचा वारा आज वर्तविण्यात आला आहे.
गेल्या २४ तासांत राज्यातील प्रमुख शहरांमध्ये नोंदवले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सियसमध्ये)
मुंबई (कुलाबा) ३४.८,
सांताक्रूझ ३४.२,
अचलबाग ३७.५,
रत्नागिरी ३४.०,
पणजी (गोवा) ३५.१,
डहाणू ३६.४,
पुणे ३७.४,
लोहगाव ३९.६,
३९.९,
जळगाव ४०.९,
कोल्हापूर ३७.०,
महाबळेश्वर ३०.९,
मालेगाव ४१.०,
नाचशक ३६.२,
सांगली ३९.६,
सातारा ३७.८,
सोलापूर ४०.८,
धाराचशव ४०.०,
छत्रपती संभाजीनगर ३९.३,
परभणी ४०.९,
नांदेड -,
बीड ४०.८,
अकोला ४३.२,
अमरावती ४२.६,
बुलढाणा ४०.५,
ब्रह्मपुरी ४४.२,
िंद्रपूर ४३.४,
गोंददया ४०.५,
नागपूर ४३.२,
वाचशम ४२.६,
वधाज ४३.५,
यवतमाळ ४१.६.










