होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

Manak Jewelers: ग्राहकांचं अस्सल सोनं ‘माणक ज्वेलर्स‌’; चोपडा तालुक्यातील एकमेव कॅरेटोमीटरयुक्त सुवर्ण दालन

On: May 27, 2026 6:28 PM
Follow Us:
---Advertisement---

Manak Jewelers: भारतीय संस्कृतीत सुवर्ण खरेदीला विशेष धार्मिक आणि सामाजिक महत्त्व आहे. शुभ कार्य, लग्नसमारंभ किंवा गुंतवणूक म्हणून सोने खरेदीला नेहमीच प्राधान्य दिले जाते. मात्र, सोन्याच्या वाढत्या किंमतीमुळे ग्राहक अधिक सजग झाले असून शुद्ध आणि प्रमाणित सोन्याची मागणी वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर चोपडा येथील ‘माणक ज्वेलर्स‌’ने ग्राहकांच्या विश्वासाला अधिक बळ देण्यासाठी अत्याधुनिक कॅरेटोमीटर मशीनची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. विशेष म्हणजे, कॅरेटोमीटर असलेले हे चोपडा तालुक्यातील एकमेव सुवर्ण दालन ठरले आहे.

सन 1893 पासून सुवर्ण व्यवसायात असलेल्या टाटीया परिवाराने पाच पिढ्यांपासून ग्राहकांचा विश्वास जपला आहे. बदलत्या काळानुसार आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारत संचालक प्रवीण टाटीया आणि नवीन टाटीया यांनी ग्राहकहिताला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. त्याचाच भाग म्हणून शोरूममध्ये अत्याधुनिक कॅरेटोमीटर मशीन बसविण्यात आले आहे.

काय आहे कॅरेटोमीटर?

कॅरेटोमीटर हे सोन्याची शुद्धता आणि त्यातील धातूंचे प्रमाण अचूकपणे तपासणारे आधुनिक उपकरण आहे. या मशीनद्वारे दागिन्यांना कोणतीही हानी न पोहोचवता काही सेकंदात सोन्याची गुणवत्ता तपासली जाते. पूर्वी शुद्धता तपासण्यासाठी दागिने घासावे किंवा वितळवावे लागत होते. मात्र, आता अवघ्या 10 ते 30 सेकंदांत 9 कॅरेट ते 24 कॅरेटपर्यंतच्या सोन्याची शुद्धता स्क्रीनवर स्पष्ट दिसून येते. विशेष म्हणजे, 99.99 टक्क्यांपर्यंत अचूक मोजमाप या मशीनद्वारे शक्य होते.

ग्राहकांचा विश्वास अधिक दृढ

सोनं खरेदी करताना ग्राहक मोठी रक्कम खर्च करतात. त्यामुळे त्यांना मिळणारं सोनं दर्जेदार आणि शुद्ध असणं आवश्यक आहे. ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी आणि त्यांना योग्य परतावा मिळावा यासाठी माणक ज्वेलर्सने ही सुविधा सुरू केली आहे. सोने खरेदी किंवा मोड देताना ग्राहकांना त्यांच्या दागिन्यांची गुणवत्ता प्रत्यक्ष मशीनद्वारे तपासून दाखविली जाते. त्यामुळे ग्राहकांचा विश्वास अधिक दृढ होत आहे.

एचयुआयडी हॉलमार्क

कॅरेटोमीटरप्रमाणेच माणक ज्वेलर्सने ग्राहकांच्या हितासाठी शोरुममध्ये एचयुआयडी हॉलमार्क असलेले स्वर्ण आणि चांदीचे आभूषण उपलब्ध करुन देले आहेत. जे शुद्धता आणि गुणवत्तेची हमी देतात. एचयुआयडी हॉलमार्क हे शुद्धतेची हमी देणारे अधिकृत मानक असून ग्राहक आपल्या फोनद्वारे एचयुआयडीच्या माध्यमातून दागिण्यांचा संपुर्ण तपशील पाहू शकतात. चांदीच्या आभूषणांमध्ये एचयुआयडी हॉलमार्क देणारे माणक ज्वेलर्स हे एकमेव दालन आहे.

ग्राहकांनी जागरूक राहावे

ग्राहक त्यांच्या कष्टाचा पैसा सोन्यात गुंतवतात. त्यामुळे त्यांनी सोन्याच्या शुद्धतेबाबत जागरूक राहणे गरजेचे आहे. ग्राहकांच्या हितासाठी आम्ही कॅरेटोमीटर मशीनची सुविधा उपलब्ध करून दिली असून प्रत्येक व्यवहारात पारदर्शकता ठेवण्याचा आमचा प्रयत्न असतो, असे माणक ज्वालर्सचे संचालक प्रवीण टाटीया आणि नवीन टाटीया यांनी सांगितले.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment