होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

मनपाने फोडला नगरसेवकांना घाम; नेमका काय प्रकार आहे ‘ते’ जाणून घ्या!

On: May 14, 2026 6:08 PM
Follow Us:
---Advertisement---

Jalgaon News: महापालिकेच्या दुसऱ्या मजल्यावरील सभागृतील एसी बंद असल्याने फॅनदेखील कुचकामी ठरत होते. परिणामी महासभेला उपस्थित असलेल्या नगरसेवकांना मनपा प्रशासनाचे चांगलाच घाम फोडला. त्यामुळे सभागृहात नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. मात्र, आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी मौनीबाबाची भूमिका निभावली.

गुरुवारी महापालिकेच्या दुसऱ्या मजल्यावरील सभागृहात मनपाची विशेष महासभा महापौर दीपमाला काळे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपमहापौर मनोज चौधरी, आदी उपस्थित होते. एकीकडे जळगाव शहरात उन्हाचा पारा 45.5 अंशावर गेला आहे. त्यातच महापालिकेच्या आजच्या महासभेत सभागृतील एसी बंद होता.

सभागृहातील फॅनदेखील गरम हवा फेकत असल्याने महासभेला उपस्थित असलेल्या नगरसेवकांना घामाच्या धारांचा सामना करावा लागला. तर काहींनी हातरुमालच्या सहाय्याने हवा घालून आपल्या घामाच्या धारा पुसण्यात व्यस्त असल्याचे चित्र होते. यावेळी नगरसेवक दीपक सूर्यवंशी यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित करीत सभागृहाचे लक्ष वेधले. त्यावेळी ज्येष्ठ नगरसेवक नितीन लढ्ढा यांनी एसी बंद ठेवून मनपा प्रशासन नगरसेवकांचा वचपा काढतेय, अशी टीका केली. तसेच सर्वच नगरसेवकांनी जळगाव महानगरपालिका प्रशासनाच्या भोंगळ कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करुन सभागृहात नाराजी व्यक्त केली.

रस्त्याच्या प्रस्तावाबाबत भाजप-शिवसेना आमने-सामने

महासभेत शहरातील समस्या आणि पटलावरील विषयावर शिवसेनेचे गटनेते विष्णू भंगाळे यांनी मेहरूण ते मोहाडी रोड जोडणाऱ्या रस्त्याच्या प्रस्तावाबाबत विश्वासात न घेतल्याने आक्रमक भूमिका घेतली. यावेळी भाजपचे नगरसेवक दीपक सूर्यवंशी यांच्यासोबत जोरदार खडाजंगी उडाली.

ललित कोल्हेंची थेट महासभेला हजेरी

जळगाव शहराजवळच असलेल्या ममुराबाद रस्त्यावरील फार्म हाऊसवर बोगस कॉल सेंटर चालविल्याच्या आरोपावरुन गेल्या अनेक महिन्यांपासून नाशिक येथील तुरुंगात असलेले माजी महापौर ललित कोल्हे यांना सर्वोच्च न्यायालयाने नुकताच जामीन मंजूर केला. त्यानंतर पहिल्यांदा नगरसेवक ललित कोल्हे हे महापालिकेतील महासभेला गुरुवारी उपस्थित राहिल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले.

बोगस कॉल सेंटर चालविल्याच्या आरोपावरुन दाखल गुन्ह्यात अटक झाल्यानंतर ललित कोल्हे यांना नाशिक मध्यवत कारागृहातील न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले होते. न्यायालयीन कोठडीत असतानाच ललित कोल्हे यांनी जळगाव महापालिकेची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. प्रतिकूल परिस्थिती, न्यायालयीन संघर्ष आणि कारागृहातील वास्तव्याच्या अडचणी असूनही त्यांनी निवडणुकीच्या मैदानातून माघार घेतली नव्हती. प्रत्यक्षात निवडणुकीत कोल्हे यांना मतदारांकडून मोठा प्रतिसाद मिळाला.

प्रचारासाठी उपस्थित नसतानाही त्यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत नगरसेवकपद आपल्या खात्यात जमा केले. त्यांच्या विजयाने स्थानिक राजकारणात मोठी चर्चा झाली होती. दरम्यान, न्यायालयीन प्रक्रियेत पुढे जात कोल्हेंच्या वतीने वकिलांकडून सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्यात आली.

दोन्ही बाजूंचे सविस्तर युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर प्रकरणातील सर्व बाबींचा विचार करून अखेर सर्वोच्च न्यायालयाने 24 एप्रिल रोजी ललित कोल्हे यांना जामीन मंजूर केला. दीर्घकाळ चाललेल्या या कायदेशीर लढाईनंतर मिळालेल्या जामिनामुळे कोल्हेंच्या कुटुंबियांमध्ये आणि समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. या वेगवान घडामोडीनंतर जळगावात दाखल झाल्यावर दि.14 मे रोजी आयोजित महापालिकेतील महासभेला उपस्थित राहुन कोल्हेंनी सहकारी नगरसेवकांना आश्चर्याचा धक्का दिला. माजी महापौर विष्णू भंगाळे यांच्या शेजारी बसून त्यांनी महासभेच्या कामकाजात सहभाग नोंदवला.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment