Crime News: नामपूर मधून एक घटना समोर आली आहे, आर्थिक अडचणी आणि पत्नीच्या आजारपणाला कंटाळून सुनील रस्तोगी नामक (५०) वर्षीय भांड्यांचा व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्याने गुरुवारी सकाळी पत्नी नेहा रस्तोगी (४५) हिला पाठीशी धरून आपल्या परवानाधारक रायफलने स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या केली. विशेषतः एकाच गोळीने दोघांचाही मृत्यू झाला. खोलीत सापडलेल्या डायरीमुळे ही आत्महत्या असल्याचे निष्पन्न झाले आहे.
उत्तर प्रदेशातील नामपूर येथील ही घटना असून शहरातील मुख्य बाजारात राहणाऱ्या सुनील रस्तोगी यांच्या पश्चात, पत्नी नेहा रस्तोगी, मुलगा पियुष रस्तोगी आणि मुलगी कृषी रस्तोगी असा परिवार आहे. ते भांड्यांचा व्यवसाय चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. पत्नीला कर्करोग झाल्याचे निदान झाल्यानंतर ते आर्थिक अडचणीत सापडले होते, त्यामुळे ते विवंचनेत होते. कुटुंबाचा पत्नीचे आजारपण आणि कुटुंबाचा खर्च कसा चालवायचा.

घटना अशी आहे.
गुरुवारी सकाळी सुमारे साडेसात वाजता व्यापाऱ्याच्या घराच्या पहिल्या मजल्यावरून गोळीबाराचा आवाज आला. गोळीबाराचा आवाज ऐकताच, त्यांचा मुलगा पियुष, मुलगी कृषी रस्तोगी आणि स्थानिक रहिवासी घटनास्थळी धावून आले, जिथे त्यांना सुनील रस्तोगी आणि त्यांच्या पत्नीचे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. यावेळी सुनील रस्तोगी यांच्या हाताजवळ एक स्टीलचा रॉड आणि जवळच एक .३१५- बोअरची रायफल सापडली. माहिती मिळताच, सीओ देवकीनंदन आणि कोतवाल प्रदीप कुमार पोलिसांसह घटनास्थळी दाखल झाले. फॉरेन्सिक टीमनेही घटनास्थळावरून पुरावे गोळा केले.
एएसपी अनुराग सिंग यांनी सांगितले की, शवविच्छेदन अहवालानुसार, व्यापाऱ्याने अगदी जवळून गोळी झाडली होती, ज्यामुळे दोघांचा जीव एकाच गोळीने गेल्याची पुष्टी झाली. त्यांच्या पत्नीच्या मृतदेहात गोळीचे तुकडे सापडले. मात्र नेमके घटनेचे कारण समोर समोर येत नव्हते. एसपी सोमेंद्र मीना यांनी सांगितले की, पोलिसांनी मृताची एक डायरीही जप्त केली आहे. डायरीनुसार, ते मोठ्या तणावाखाली होते. पोलीस तपास आणि शवविच्छेदन अहवालातून मृत्यूचे कारण आत्महत्या असल्याचे समोर आले आहे. छतावर पडलेल्या व्यावसायिक सुनील रस्तोगी यांच्या मृतदेहाच्या हातात एक स्टीलचा पाईप होता आणि जवळच एक रायफल पडलेली होती. किंचित वाकलेल्या स्टीलच्या पाईपमुळे विविध चर्चां सुरू होती. काहींना तर हाणामारी झाल्याचा संशयही आला.
आपल्या मुलाला लिहिलेल्या डायरीतून सत्यसमोर
डायरीतील माहिती अशी, शहाबादमधील भांडी व्यापारी सुनील रस्तोगी यांनी आत्महत्या करण्यापूर्वी १५ पानांची डायरी लिहिली. डायरीमध्ये, त्यांनी आपले नैराश्य, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि पत्नीच्या आजारपणाचा उल्लेख करून आत्महत्येचे संकेत दिले. त्यांनी लिहिले की, दीर्घकाळच्या मानसिक तणावामुळे त्यांना कुटुंबावर ओझे व्हायचे नव्हते. डायरीमध्ये आपला भाचा गौरव याला उद्देशून सुनील यांनी लिहिले, “प्रिय गौरव, राम-राम, जुलै २०२४ मध्ये अनुच्या लग्नानंतर सहा दिवसांनी, माझ्या कमरेत अचानक वेदना सुरू झाल्या. उपचार करूनही मला आराम मिळाला नाही. कुटुंब कसे जगणार या चिंतेने मी नैराश्यात गेलो.”
त्यांनी पुढे लिहिले की नोव्हेंबर २०२४ मध्ये त्यांच्या पत्नीची प्रकृती खालावली. त्यानंतर, त्यांनी स्वतःच्या दुःखाकडे दुर्लक्ष केले आणि पत्नीच्या उपचारांवर व कामावर लक्ष केंद्रित करणे सुरू ठेवले. १६ ऑगस्ट २०२५ रोजी, त्याच्या पत्नी आणि मुलाचा अपघात झाला, त्यानंतर त्याची पत्नी मानसिकदृष्ट्या खचली. डायरीत त्याने लिहिले आहे की, त्याचा मुलगा पियुष गेल्या १८ महिन्यांपासून ‘श्रावण कुमार’प्रमाणे आपल्या आई-वडिलांची काळजी घेत होता. त्याने लिहिले, “मी आता आणखी ओझे बनू शकत नाही, म्हणून मी माझ्या पत्नीला सोबत घेऊन जात आहे. कृपया मला माफ करा; मला माझ्या पत्नीचा मारेकरी किंवा माझ्या मुलांचा दुर्दैवी बाप म्हणवून घेण्याची माझी लायकी नाही.” तसेच डायरीत सुनीलने पत्नी आणि मुलांवरील प्रेमाचा उल्लेख केला आहे, तसेच मुलाच्या व्यावसायिक शिक्षणाबद्दल, मुलीच्या लग्नाबद्दल आणि मालमत्तेच्या बाबींबद्दल लिहिले आहे. त्याने नातेवाईक आणि सासरच्या मंडळींचाही उल्लेख केला आहे.
रायफलच्या ट्रिगरसाठी रॉड वापरल्याचा संशय
एएसपी अनुराग सिंह यांनी सांगितले की, घटनास्थळावरून एक लोखंडी सळई देखील जप्त करण्यात आली आहे. सुनीलने रायफलचा ट्रिगर दाबण्यासाठी तिचा वापर केला असावा, असा संशय आहे. पोलीस सर्व बाबींचा तपास करत आहेत. सिंह यांनी सांगितले की, पोलिसांनी एक डायरी जप्त केली आहे, जी अलीकडेच लिहिलेली असल्याचे दिसते. संपूर्ण डायरी एकाच पेनाने लिहिलेली होती. डायरीनुसार, सुनीलला संधिवाताचा त्रास होता, तर त्याच्या पत्नीला स्तनाचा कर्करोग होता. त्यांनी सांगितले की, पत्नीच्या अपघातानंतर सुनील मानसिक तणाव आणि नैराश्याने ग्रस्त होता. प्राथमिक तपासात हे आत्महत्येचे प्रकरण असल्याचे समोर आले आहे.









