होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

जळगावमध्ये सोन्याच्या किंमती किती आहेत ‘ते’ जाणून घ्या!

On: May 18, 2026 4:45 PM
Follow Us:
---Advertisement---

Jalgaon News: सोन्याकडे खात्रीशीर गुंतवणूक म्हणून बघण्याचा जो दृष्टीकोन आहे तो कायम असून सुरक्षित गुंतवणूक म्हणून अजून ही ग्राहक सोन्याला पसंती देत आहेत. विशेतः जळगावमधील सोन्याच्या दरांवर अनेक घटकांचा प्रभाव पडतो, ज्यामध्ये जागतिक घडामोडींचाही समावेश असतो, त्यामुळे जळगाव सोने बाजारावर ग्राहकांची नजर असते, जळगाव बाजारात घसरणीनंतर २४ कॅरेट सोने दर हा १० ग्रॅमला १,५१,३७० इतका असून, यामध्ये २९ टक्क्यांची वाढ झाल्याचे दिसून येत आहे; तर काल, रविवारी हा दर १,५०,९३० इतका होता.

सध्या लग्नसराईचे दिवस असून घसरणीनंतर ग्राहकांना सोने खरेदीची चांगली संधी आहे, किंचित वाढ  असली तरी सोने खरेदीकडे ग्राहकांनी पाठ फिरवलेली नाही. पंतप्रधानाच्या आवाहनंतर ही सोने खरेदीचे प्रमाण कमी झाले नसून बाजारात सोन्याला मागणी कायम असून सोने आज ४४० रुपयांनी किंचित वाढल्याचे बघायला मिळाले, असे ग्रो संस्थने (Groww) म्हटले आहे.

तर २२ कॅरेट सोन्याचा भाव १,३९ २६० इतका होता.४०४.८० रुपयांची वाढ दर्शविली आहे. १८ कॅरेटचा भाव ११३५२७ इतका भाव आहे, त्यातही ३३० रुपयांची किरकोळ वाढ झाली आहे. हे सर्व भाव १० ग्रॅम सोन्याचे आहेत. ८ ग्रॅम सोन्याचा दार ही वाढला आहे. १,२१,०९६ इतका आहे, काल हा १,२०, ७४४ इतका होता,३५२ रुपयांची वाढ झाली आहे. ही वाढ २९ टक्के झाली आहे, तरी सोनीची मागणी सध्या तरी कायम असल्याचे दिसते.

भारतीय घरांमध्ये सोन्याला अत्यंत मौल्यवान आणि शुभ मानले जाते. केवळ सांस्कृतिक महत्त्वच नव्हे, तर सोन्याचा समावेश हा एका उत्तम गुंतवणूक पोर्टफोलिओसाठीही फायदेशीर ठरतो. याच कारणांमुळे, जळगावसह संपूर्ण देशभरात सोन्याची मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जाते. केवळ प्रत्यक्ष सोन्यातच नव्हे, तर गुंतवणूकदारांनी आता विविध एक्स्चेंजेसच्या माध्यमातून ‘कमोडिटी’ (वस्तू) म्हणून सोन्याचा व्यापार करण्यास आणि सोन्यावर आधारित ‘डेरिव्हेटिव्ह्ज’मध्ये गुंतवणूक करण्यासही सुरुवात केली आहे.
.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment