होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

बंगाल-आसाममध्ये भाजपची मुसंडी, केरळचा गड कॉँग्रेसने राखला तर तामिळनाडूत टीव्हीकेचा उदय

On: May 4, 2026 7:48 PM
Follow Us:
---Advertisement---

New Delhi: देशात सर्वाधिक लक्ष लागलेल्या पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या टीएमसी पार्टीला मोठा धक्का बसला आहे. बंगालने ममतांचा गढ उद्धवस्त करून भाजपला संधी देत नव्या अध्यायाची सुरुवात केली आहे. आसाममध्ये पुन्हा भाजपाचे हिमंता सरकार येण्याची औपचारिकता राहिली आहे. तर केरळमध्ये काँग्रेसने आपला गड पुन्हा शाबुत ठेवण्यात यश मिळवले आहे. तामिळनाडूत अभिनेता विजय थलपतीने इतिहास घडवला. त्याने टीव्हीके हा पक्ष स्थापन करून बहुमताचा आकडा हासिल केल्याने तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदावर विजय विराजमान होणार आहे.

बंगालने भाजपला संधी देत नवा अध्यायाची सुरुवात केली आहे. गेली १५ वर्षे सत्तेत असलेल्या ममता दीदी यांच्या तृणमूल काँग्रेसला यंदा मतदारांनी नाकारल्याचं चित्र असून भाजप पहिल्यांदाच याठिकाणी सत्तेत येत आहे. भाजपने बंगालमध्ये बहुमताचा टप्पा ओलांडला आहे. 190 पार करत भाजपचा राज्यात मोठा विजय होताना दिसतो आहे. मतदारांचा हा कल म्हणजे ममता दीदींच्या राजकारणाला मोठा धक्का मानला जात आहे. आसाम विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीचा पहिला टप्पा संपत असताना, भाजपला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचे कल दर्शवत आहेत. भाजप ८३ जागांवर आघाडीवर आहे, तर काँग्रेस २७ जागांवर आघाडीवर आहे. प्रमुख जागांपैकी, भवानीपूर-सोरभोग येथे मंत्री रणजित कुमार दास आघाडीवर आहेत. नुकतेच काँग्रेसमधून भाजपमध्ये सामील झालेले प्रद्युत बोरदोलोई दिसपूर जागेवर आघाडीवर आहेत.

केरळमध्ये तब्बल १० वर्षांनंतर काँग्रेस आघाडी घेत जोरदार पुनरागमन केले आहे. १४० विधानसभा जागा असलेल्या केरळमध्ये, काँग्रेस आघाडी अंदाजे ९० जागांवर आघाडी घेणार असल्याचा अंदाज आहे. या विजयामुळे काँग्रेसने सात वर्षांनंतर एक नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. केरळमधील हा विजय काँग्रेससाठी महत्त्वाचा आहे, कारण गांधी घराण्याच्या सदस्या प्रियांका गांधी या केरळच्या लोकसभा खासदार आहेत. शिवाय, संघटनात्मक सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल हे देखील केरळचे आहेत. काँग्रेस पक्षात संघटनात्मक सरचिटणीस हे दुसरे सर्वात शक्तिशाली पद मानले जाते. तमिळनाडूच्या राजकारणात अभिनेते थलपती विजय यांच्या प्रवेशाने पहिल्याच विधानसभा निवडणुकीत टीव्हीकेने जोरदार प्रभाव पाडला आहे. विजय यांच्या ‌‘तमिळगा वेत्री कळघमम (टीव्हीके) या नव्या पक्षाने तामिळनाडूतील राजकीय समीकरणे पूर्णत: बदलून टाकले आहे.थलपती विजय याला तामिळनाडूच्या जनतेने भरभरुन मतदान केलं आहे. सकाळपासून सुरु असलेल्या मतमोजणीत थलपती विजय याचा टीव्हीके पक्ष सर्वात जास्त आघाडीवर होता. रात्री उशीरापर्यंत समोर आलेल्या कलांनुसार, थलपती विजय यांचा टीव्हीके १०० हून अधिक जागांवर आघाडीवर असल्याचे दिसून आले. त्यामुळे तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाचे थलपती विजय दावेदार मानले जात आहे.

ममतादीदींचा हायव्होल्टेज ड्रामा

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये भवानीपूर विधानसभा मतदारसंघातील मतमोजणीदरम्यान प्रचंड हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळत आहे. मतमोजणी केंद्रावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि भाजप नेते सुवेंदु अधिकारी यांच्यात जोरदार संघर्ष निर्माण झाला असून, गेल्या दीड तासांपासून याठिकाणी मतमोजणी थांबवण्यात आली आहे. ‌‘माझी मते लुटली जात आहेत‌’, असा खळबळजनक आरोप ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोग आणि भाजपवर केला आहे. त्यामुळे येथे तणाव निर्माण झाला होता.

जळगाव भाजप कार्यालयात विजयाचा जल्लोष!

आज देशातील पश्चिम बंगाल, आसाम, पॉंडिचेरी, केरलम व तमिळनाडू या राज्यात विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून यामध्ये भारतीय जनता पार्टीला आसाम, पश्चिम बंगाल आणि पांडिचेरी या राज्यात स्पष्ट बहुमत मिळाले असून तसेच केरळ व तमिळनाडूमध्ये सुद्धा भाजपला चांगल्या प्रमाणात यश प्राप्त झाले आहे. याचा आनंद व विजय उत्सव आज भाजप कार्यालय जी एम फाउंडेशन येथे दुपारी जल्लोष साजरा करण्यात आला. जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे (राजू मामा), जिल्हा महानगर अध्यक्ष दीपक सूर्यवंशी, महापौर दीपमालाताई काळे, गटनेते प्रकाश भाई बालानी, प्रदेश सरचिटणीस भैरवीताई वाघ तसेच भाजपाचे जिल्हा पदाधिकारी, नगरसेवक, व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत मोठा जल्लोष व आनंद उत्सव फटाके फोडून आणि पेढे वाटप करून साजरा केला. विशेतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वाना मिठाई वाटप करून आनंद साजरा केला.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment