Jalgaon News: जिल्हा परिषदेच्या विविध विभागात कार्यरत असलेल्या एकूण 97 कर्मचार्यांच्या सर्वसाधारण बदल्यांची प्रक्रिया दि. 11 मे रोजी जिल्हा परिषदेच्या शाहू महाराज सभागृहात समुपदेशन पद्धतीने झाली. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी प्रत्यक्ष समुपदेशन करून कर्मचार्यांना पदस्थापना दिली. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज चौधरी यांच्यासह विविध विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते.
जिल्हा परिषद प्रशासनामार्फत सर्वसाधारण बदल्यांची प्रक्रिया पारदर्शक व समन्वयात्मक पद्धतीने राबविण्यात आली. विविध संवर्गातील कर्मचार्यांच्या प्रशासकीय, विनंती तसेच आपसी बदल्या करण्यात आल्या. यामध्ये पशुधन पर्यवेक्षक संवर्गातील 7 कर्मचार्यांच्या प्रशासकीय तर 2 कर्मचार्यांच्या विनंती बदल्या करण्यात आल्या. सहाय्यक लेखाधिकारी संवर्गातील 1 प्रशासकीय व 1 विनंती बदली करण्यात आली.

कनिष्ठ लेखाधिकारी संवर्गातील 1 कर्मचार्याची विनंती बदली करण्यात आली. वरिष्ठ सहाय्यक लेखा संवर्गातील 1 प्रशासकीय तर कनिष्ठ सहाय्यक लेखा संवर्गातील 1 विनंती बदली केली. परिचर संवर्गातील 10 कर्मचार्यांच्या विनंती बदल्या करण्यात आल्या आहे. विस्तार अधिकारी (सांख्यिकी) संवर्गातील 1 कर्मचार्याची तसेच वाहन चालक संवर्गातील 1 कर्मचार्याची विनंती बदली करण्यात आली. आरोग्य सेवक संवर्गातील 4 कर्मचार्यांच्या प्रशासकीय, 14 कर्मचार्यांच्या विनंती तर 2 कर्मचार्यांच्या आपसी बदल्या करण्यात आल्या. आरोग्य सेविका संवर्गातील 21 कर्मचार्यांच्या प्रशासकीय, 11 कर्मचार्यांच्या विनंती तर 1 कर्मचार्याची आपसी बदली करण्यात आली. आरोग्य सहाय्यक संवर्गातील 6 पुरुष कर्मचार्यांच्या विनंती बदल्या करण्यात आल्या. आरोग्य सहाय्यक महिला संवर्गातील 2 प्रशासकीय व 3 विनंती बदल्या करण्यात आल्या.
आरोग्य पर्यवेक्षक संवर्गातील 1 कर्मचार्याची विनंती बदली करण्यात आली. औषध निर्माण अधिकारी संवर्गातील 2 कर्मचार्यांच्या प्रशासकीय तर 3 कर्मचार्यांच्या विनंती बदल्या करण्यात आल्या. प्रयोगशाळा संवर्गातील 1 कर्मचार्याची प्रशासकीय बदली करण्यात आली. जिल्हा परिषदेंतर्गत विविध विभागांतील एकूण 39 कर्मचार्यांच्या प्रशासकीय, 55 कर्मचार्यांच्या विनंती तसेच 3 कर्मचार्यांच्या आपसी बदल्या समुपदेशन प्रक्रियेद्वारे करण्यात आल्या. संवर्गातील 21 कर्मचार्यांच्या प्रशासकीय, 11 कर्मचार्यांच्या विनंती तर 1 कर्मचार्याची आपसी बदली करण्यात आली. आरोग्य सहाय्यक संवर्गातील 6 पुरुष कर्मचार्यांच्या विनंती बदल्या करण्यात आल्या.
आरोग्य सहाय्यक महिला संवर्गातील 2 प्रशासकीय व 3 विनंती बदल्या करण्यात आल्या. आरोग्य पर्यवेक्षक संवर्गातील 1 कर्मचार्याची विनंती बदली करण्यात आली. औषध निर्माण अधिकारी संवर्गातील 2 कर्मचार्यांच्या प्रशासकीय तर 3 कर्मचार्यांच्या विनंती बदल्या करण्यात आल्या. प्रयोगशाळा संवर्गातील 1 कर्मचार्याची प्रशासकीय बदली करण्यात आली. जिल्हा परिषदेंतर्गत विविध विभागांतील एकूण 39 कर्मचार्यांच्या प्रशासकीय, 55 कर्मचार्यांच्या विनंती तसेच 3 कर्मचार्यांच्या आपसी बदल्या समुपदेशन प्रक्रियेद्वारे करण्यात आल्या.






