होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

जळगावमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस, पारा ‘इतका’ घसरला; तुमच्या जिल्ह्यातील तापमान किती ‘ते’ जाणून घ्या!

On: May 6, 2026 6:58 PM
Follow Us:
---Advertisement---

Letest Weather News: जळगावचा पारा ४०. ४ अंशावर घसरला आहे. मंगळवारी काल ४०.९ इतका होता, बुधवारी पारा आणखी घसरला आहे. काही ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि पाऊस पडला असून हवेत उष्णतेचे प्रमाण कमी झाल्याचे जाणवले. मात्र काही काळ जळगावकरांना दिलासा मिळाला परंतु पुन्हा सायंकाळी वातावरणात उकाडा जाणवत होता. एप्रिलच्या शेवटला आणि मे सुरुवातीला जळगावचे तापमान ४२ ते ४४ अंश सेल्सियस पर्यंत पोहचले होते. त्यामुळे वातावरणात उष्मा निर्माण होऊन रस्ते निर्मनुष्य झाले होते. दुपारी १२ ते ४ या दरम्यान न फिरण्याचे आवाहन शासनाने केलं होते. तसेच उष्मघात कक्ष ही स्थापण्यात आला आहे.

विदर्भात तुरळक ठिकाणी गारांसह जोरदार पाऊस झाला आहे. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला असून कोकण- गोवा, मध्य महाराष्ट्रात हवामान कोरडे होते. कोकण- गोव्यात बहुतांश ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. उर्वरित राज्यात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान वर्धा येथे ४३.५ अंश सेल्सियस नोंदवले गेले आहे. तर सर्वात कमी म्हणजे किमान तापमान महाबळेश्वरला ३०.९ इतके नोंदवले गेले आहे.

गेल्या २४ तासांत राज्यातील प्रमुख शहरांमध्ये नोंदवले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सियसमध्ये)

मुंबई (कुलाबा) ३४.८,
सांताक्रूझ ३४.१,
अचलबाग ३७.५,
रत्नागिरी ३४.५,
पणजी (गोवा) ३५.४,
डहाणू ३५.२,
पुणे ३७.२,
लोहगाव ४०.१,
अहिल्यानगर ३९.०,
जळगाव ४०.४,
कोल्हापूर ३६.९,
महाबळेश्वर ३०.९,
मालेगाव ३९.६,
अकोला ४२.५,
अमरावती ४२.८,
बुलढाणा ३८.७,
ब्रह्मपुरी ४२.२,
चंद्रपूर ४२.०,
गोंदिया ३८.०,
नागपूर ४०.८,
वाशीम ४२.४,
वर्धा ४३.५,
यवतमाळ ४१.८

 

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment