होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

युद्धाचा ६४ वा दिवस: होर्मूझ सामुद्रधुनीत इराणला टोल देणाऱ्यांवर अमेरिका निर्बध लादणार!

On: May 2, 2026 5:19 PM
Follow Us:
---Advertisement---

America-Israel- Iran War: इराण आणि अमेरिका- इस्रायल यांच्यातील युद्धाचा ६४ वा दिवस आहे, मात्र युद्धाचे काळे ढग कायम आहे, त्याचवेळी, वॉशिंग्टनने इशारा दिला आहे की, होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाण्यासाठी इराणला टोल किंवा शुल्क देणाऱ्या जहाजांवर अमेरिकेचे निर्बंध लादले जाऊ शकतात, ज्यामुळे तेहरानशी संबंधित सागरी हालचालींवर अधिक कठोर भूमिका घेण्याचे संकेत मिळत आहेत, (America-Israel- Iran Waर):असे वृत्त अल जंजिराने दिले आहे.

अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने इराणच्या पेट्रोलियम निर्यातीशी संबंधित संस्थांवर नवीन निर्बंध लादण्याचा विचार सुरू आहेत. ज्यात चीनस्थित किंगदाओ हाये ऑइल टर्मिनलचा समावेश आहे. या संस्थेवर लाखो बॅरल निर्बंधित कच्चे तेल आयात करून तेहरानला अब्जावधी डॉलर्सचा महसूल मिळवून दिल्याचा आरोप आहे. बीजिंगने या कारवाईला बेकायदेशीर ‘एकतर्फी निर्बंध’ म्हणून फेटाळून लावले आहे.America-Israel- Iran War:

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या ताज्या शांतता प्रस्तावावर नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, “ते अशा गोष्टी मागत आहेत ज्या मला मान्य नाहीत”,असे सांगून तेहरानचा प्रस्ताव त्यांनी फेटाळून लावला आहे. दरम्यान, वॉशिंग्टन पोस्ट-एबीसी न्यूज-इप्सोसच्या एका नवीन सर्वेक्षणानुसार, ६१ टक्के अमेरिकन लोकांचा असा विश्वास आहे, की ट्रम्प यांनी इराणविरुद्ध लष्करी बळाचा वापर करणे ही एक चूक होती. त्यामुळे ट्रम्प यांना हा मोठा झटका मानला जात आहे. America-Israel- Iran War:

युद्धाविषयी काही महत्त्वाच्या अपडेट

दरम्यान इराणमध्ये स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, वायव्येकडील झांजन प्रांतात शुक्रवारी न फुटलेले स्फोटक निकामी करण्याच्या कारवाईदरम्यान चौदा सैनिक ठार झाले. सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांनी आपल्या लोकांना आर्थिक लढाई लढण्याचे आणि शत्रूंना परास्त करण्याचे आवाहन केले आहे, इराणचे अमेरिका आणि इस्रायलसोबतचे युद्ध हे अनेक वर्षांच्या निर्बंधांचा परिणाम आहे.

इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) नौदलाने म्हटले आहे की, ते आपल्या किनारपट्टीजवळील पाण्यावर ‘नवीन नियम’ लागू करेल, ज्याचा उद्देश त्या प्रदेशासाठी ‘सुरक्षा आणि समृद्धीचा स्रोत’ बनवणे आहे.

अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने सांगितले की, त्यांनी इस्रायल, कतार, कुवेत आणि संयुक्त अरब अमिरातीला ८.६ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त किमतीच्या लष्करी विक्रीला मंजुरी दिली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment