होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

चांदी कारागिराला शॉक देऊन लुटणाऱ्या चोरट्यास ठोकल्या बेड्या, शनिपेठ पोलिसांची कारवाई!

On: May 24, 2026 5:32 PM
Follow Us:
---Advertisement---

Jalgaon News: एका आठोवड्यापूर्वी जळगाव शहरातील बालाजीपेठ परिसरात चांदीचे दागिने बनविणाऱ्या कारागिराला शॉक मशिनद्वारे विद्युत धक्का देऊन दागिने लांबविण्याचा प्रकार घडला होता, या प्रकरणातील संशयित फरार झाला होता, अखेर चोरीचा प्रयत्न करणाऱ्या संशयिताला शनिपेठ पोलिसांनी अटक केली आहे. तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पोलीस चोरट्यापर्यंत पोहचून अटक केली. दि १६ मे रोजी ही घटना घडली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील बालाजीपेठेतील आर.एल. ज्वेलर्सच्या मागील बाजूस असलेल्या इमारतीच्या तळमजल्यावर भरत भामरे हे चांदीची दागिने बनविण्याचे काम करतात. १६ मे रोजी दुपारच्या सुमारास तोंडावर रुमाल बांधून एक संशयित तेथे आला. त्याने काळ्या रंगाच्या शॉक मशिनच्या आधारे भामरे यांना विजेचा शॉक दिला. भामरे बेशुद्ध झाल्यावर, त्याच्याकडील चांदीचे दागिने चोरी करण्याचा प्रयत्न झाला. या प्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाची चौकशी उपनिरीक्षक खेडकर हे करीत असून त्यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तपासादरम्यान संशयिताचा माग काढण्यासाठी पोलिसांनी घटनास्थळ तसेच भुसावळकडे जाणाऱ्या मार्गांवरील सर्व सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी केली असता सत्य समोर आले.

त्यात संशयित हा भुसावळमधील कंडारी शिवार परिसरातील असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी अभिषेक राजेंद्र शर्मा (वय ३१, रा. साकरी फाटा, शिवकॉलनी, भुसावळ) याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याच्याकडून पोलिसांनी (एमएच १९ बीके ८७७५) क्रमांकाची गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त केली. तसेच गुन्हा करतांना परिधान केलेले कपडे आणि मोबाईल ही जप्त केला.

यापूर्वी संशयिताविरुद्ध तपासात भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.
शनीपेठ पोलीस ठाण्याचे साजिद मन्सुरी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक खेडकर, गुन्हे शोध पथकातील योगेश जाधव, निलेश घुगे, अमोल वंजारी, पराग दुसाने, योगेश साबळे, काजल सोनवणे, देशमुख यांनी ही कारवाई केली.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment