Advisory to Indian Citizens: इराण आणि अमेरिकेत पाकिस्तानात वाटाघाटी होतील असे वाटत होते, इराणचे वार्ताकार पाकिस्तानात पोकंगाले होते .त्यांनी पाकिस्ताच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची भेट घेतली. मात्र अमेरिकेशी थेट चर्चा करण्याचे त्यांनी टाळले त्यामुळे अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव अद्याप कायम आहे. अमेरिका शांतीवार्ता करण्याची भाषा करत असला तरी इराणच्या आजूबाजूला अमेरिकेने नाकेबंदी केली आहे. त्यामुळे इराणने ही कठोर भूमिका घेत तूर्तास थेट चर्चा टाळली आहे, एकंदरीत अशा तणाव पूर्ण वातावरणात परिस्थिती आणखी बिघडू शकते त्यामुळे भारत सरकारने भारतीय नागरिकांसाठी इराणला प्रवास न करण्याच्या सूचना जारी केली आहे.
दरम्यान एकंदरीत विमान वाहतूकीत सातत्याने सुधारण होत असून, या भागातून भारतातील विविध शहरांमध्ये अतिरीक्त विमाने चालवण्यात येत आहेत. २८ फेब्रुवारी पासून या भागामधून १२, ६५, ००० प्रवासी भारतात परतले आहेत. इराणची हवाई हद्द चार्टर्ड विमाने आणि मालवाहतूक करणाऱ्या विमानांसाठी अंशतः खुली करण्यात आली आहे. भारतीयांना इराणमध्ये प्रवास न करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून जे इराणमध्ये आहेत त्यांनी भारतीय दूतावासाच्या मदतीने जमीनींवरील सीमांच्या माध्यमातून इराण सोडण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत. तेहरानच्या भारतीय दूतावासाने आतापर्यंत जमिनींवरील सीमांच्या माध्यमातून 2,443 भारतीयांना बाहेर पडण्यात मदत केली आहे.
इस्रायलची हवाई हद्द खुली करण्यात आली असून या भागात मर्यादित विमान सेवा सुरु करण्यात आली आहे. ती पुढे भारतात येण्यासाठीही वापरता येणार आहे. आखातातील परिस्थिती अद्याप पूर्वपदावर आलेली नाही, त्यामुळे नागरिकांना सकुशल तेथून बाहेर काढण्यासाठी सरकार त्या त्या सरकारांशी बोलणी करून नागरिकांना बाहेर काढले जात आहे.






