Jalgaon News: माध्यमिक आणि उच्च माध्यामिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल शनिवार दि. 2 मे रोजी बोर्डाचा संकेतस्थळावर जाहीर झाला आहे. यंदा बारावी परीक्षेत सावित्रीच्या लेकीच टॉपर ठरल्या आहेत. कोकण विभागाचा निकाल 94.14 टक्के तर राज्याचा निकाल 89.79 टक्के लागला. गेल्या अनेक दिवसांपासून निकालाची प्रतीक्षा करणार्या 15 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा ठरला. यंदा राज्भरातून एकूण 15 लाख 32 हजार 487 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली. यामध्ये सर्वाधिक संख्या विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांची आहे.
राज्य निकालाची टक्केवारी 89.79
राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर क कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून विज्ञान, कला, वाणिज्य व व्यवसाय अभ्यासक्रम व आय. टी. आय. या शाखांसाठी एकूण 14 लाख 44 हजार 713 नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 14 लाख 33 हजार 58 विद्यार्थी प्रविष्ट होते व 12 लाख 86 हजार 843 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व उत्तीर्णतची टक्केवारी 89.79 आहे.
खाजगी विदयार्थी म्हणून नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या 37,559 एवढी असून त्यापैकी 36,941 विद्यार्थी प्रविष्ट झाले असून 29,634 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यांच्या उत्तीर्णतची टक्केवारी 80.21 आहे. या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळांमधून सर्व शाखांमधून एकूण 50,876 पुनर्परिक्षार्थी विद्याथ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 50,346 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले. त्यापैकी 18,349 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी 36.44 आहे.
या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळांमधून सर्व शाखांमधून एकूण 50,876 पुनर्परिक्षार्थी विद्याथ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 50,346 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले. त्यापैकी 18,349 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी 36.44 आहे. मे रोजी दुपारी एक वाजता मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर झाला आहे. यंदा बारावी परीक्षेत सावित्रीच्या लेकीच टॉपर ठरल्या आहेत. कोकण विभागाचा निकाल 94.14 टक्के तर राज्याचा निकाल 89.79 टक्के लागला.
१२ वी परीक्षेत डॉ. बेंडाळे महिला महाविद्यालयाचे घवघवीत यश!
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इ. १२ वी परिक्षेचा निकाल लागला आहे. असून डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालयाचा विज्ञान शाखेचा ७०.३१%, वाणिज्य शाखेचा ६१.२२% , कला शाखेचा निकाल ५८.०२%,तर एच.एस.सी.व्ही.सी.
विभागातील इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी विभागाचा ७३.५१,% निकाल लागला आहे. त्यात महाविद्यालयातील विद्यार्थिनीनी घवघवीत यश संपादन केले.आहे.
कला शाखेतून कु.अनामिका रवींद्र चव्हाण ही विद्यार्थिनी ७२.५ % गुण मिळवून प्रथम क्रमांकाने तर कु. ईश्वरी महेश जोशी ही ७१.३३ % गुण मिळवून द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. वाणिज्य शाखेतून कु. क्रिपा नितीन खूबचंदाणी ही ९४% गुण मिळवून प्रथम, तर कु.जान्हवी दिनेश भीरुड ही ९२.१७.% गुण मिळवून द्वितीय तसेच विज्ञान शाखेतून कु. वैभवी आनंद कंक ही ७६.५% गुण मिळवून प्रथम तर कु. नंदिनी राजेश सोनवणे हीने ७५.५ % गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळविला.
महाविद्यालयाच्या एच. एस. सी. व्ही. सी. विभागाच्या इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी शाखेतून कु. फिरदोस बशीर पिंजारी ही ६५.८३% गुण मिळवून प्रथम तर पवार अश्विनी विजय ही ६५.५०% गुण मिळवून द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली. बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनींचा प्राचार्य व उपप्राचार्य समन्वयक व शिक्षक वृंद यांच्यातर्फे सत्कार करण्यात आला.
सर्व यशस्वी विद्यार्थिनींचे लेवा एज्युकेशनल युनियन संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे, सर्व संचालक मंडळ; महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. नारखेडे, उपप्राचार्य डॉ. सत्यजित साळवे, उपप्राचार्य डॉ. पी. एन. तायडे, उपप्राचार्य सुनीता पाटील,समन्वयक प्रा. एन. जी. बावस्कर, प्रा. के. सी. वंजारी तसेच शिक्षकवृंद व शिक्षकेतर सहकाऱ्यांनी अभिनंदन केले.











