होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

अमेरिकेने होर्मूझमध्ये घुसण्याचा प्रयत्न केल्यास हल्ला करू, इराणी लष्कराचा इशारा

On: May 4, 2026 4:49 PM
Follow Us:
---Advertisement---

America Israel-Iran Conflict: होर्मूझ सामुद्रधुनीवरून अमेरिका आणि इराण यांच्यात तणाव कायम आहे, जर अमेरिकी सैन्याने होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ जाण्याचा किंवा त्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, तर त्यांच्यावर हल्ला केला जाईल, असा इशारा इराणच्या लष्कराने दिला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘प्रोजेक्ट फ्रीडम’ नावाच्या नौदल अभियानाची घोषणा केल्यानंतर हा इशारा देण्यात आला आहे. या मोहिमेअंतर्गत होर्मुझच्या सामुद्रधुनीत अडकलेल्या जहाजांना बाहेर काढण्यासाठी मार्गदर्शन केले करणे आणि येत्या काही तासांत या मोहिमेला सुरुवात होणार आहे.

इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, युद्ध संपवण्यासाठीच्या त्यांच्या ताज्या १४- कलमी प्रस्तावावर वॉशिंग्टनकडून येणाऱ्या प्रतिसादाचे ते मूल्यांकन करत आहेत. ट्रम्प यांनी तेहरानच्या प्रस्तावाला “अस्वीकार्य” म्हटले होते. त्यामुळे शांतीवार्ता अद्याप सुरू होऊ शाली नाही. इस्रायलने लेबनॉनवर बॉम्बहल्ला सुरूच ठेवला असून, त्यात पाच वैद्यकीय कर्मचारी जखमी झाले आहेत. त्यांनी तथाकथित “ऑरेंज लाइन”ची घोषणा करून गाझामधील आपल्या नियंत्रणाखालील क्षेत्राचा विस्तार केला आहे.

इराणच्या फार्स वृत्तसंस्थेने स्थानिक सूत्रांचा हवाला देत म्हटले आहे की, रिव्होल्यूशनरी गार्डने थांबण्याचा इशारा दिल्यानंतरही त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे जास्क बेटाजवळ अमेरिकेच्या नौदलाच्या जहाजावर दोन क्षेपणास्त्रे आदळली.अध्यक्ष ट्रम्प यांनी सोमवारी होर्मुझच्या सामुद्रधुनीत अडकलेल्या जहाजांना ‘मार्गदर्शन’ करण्यासाठी अमेरिका ‘प्रोजेक्ट फ्रीडम’ सुरू करेल, असे स्पष्ट केल्यावर हा कथित हल्ला झाला आहे.

अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने सांगितले की, ते या प्रयत्नांना १५ हजार लष्करी जवान, १०० हून अधिक जमिनीवरील आणि समुद्रातील विमाने, तसेच युद्धनौका आणि ड्रोनच्या साहाय्याने मदत करणार आहे, असे अल जंजिराने आपल्या वृत्तात म्हटले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

केतन हत्याकांडानंतर आणखी एक घटना उघडकीस; पत्नीने प्रियकर सोनूच्या मदतीने काढला मोनूचा काटा

ISRO Gets Bomb Threat: इस्रोच्या बंगळुरू मुख्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी, यंत्रणा अलर्ट

23 political parties Letter to Chief Justice over SIR: निवडणूक आयोगाच्या कारभारावर नाराजी! देशातील 23 विरोधी पक्षांचे सरन्यायाधीशांना पत्र

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारत भेटीवर येणार, परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांचा दुजोरा

बापरे..! शतकातील सर्वात मोठा भूकंप: मृतांची संख्या २३५ वर; जाणून घ्या कुठे घडली घटना..

बंद पडण्याच्या मार्गावर असलेल्या ‘नाफेड’ला नफा; डाळीचा प्रत्येक दाणा थेट शेतकऱ्यांकडून खरेदी करणार: केंद्रीयमंत्री अमित शहा

Leave a Comment